Gold Price: सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; उच्चांकी भावापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त
Gold Rates | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याच्या किंमतीने गेल्या तीन आठवड्यांमधील नव्या उच्चांकाला गवसणी घातली. स्पॉट गोल्डची किंमत 0.4 टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस 1, 798. 46 डॉलर्सवर पोहोचली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत असलेले सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किंचीत वाढ पाहायला मिळाली होती. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर (MCX) 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 120 रुपयांनी वाढली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold) 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 46400 आणि 47400 रुपये इतकी झाली होती. त्यामुळे सध्या सोने सार्वकालिक उच्चांकापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त भावात मिळत आहे. (Gold rates on MCX commodity Market)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याच्या किंमतीने गेल्या तीन आठवड्यांमधील नव्या उच्चांकाला गवसणी घातली. स्पॉट गोल्डची किंमत 0.4 टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस 1, 798. 46 डॉलर्सवर पोहोचली. अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणावर सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाटचाल अवलंबून आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.
सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर?
BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र
Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज
(Gold rates on MCX commodity Market)