Gold Price: सलग दुसर्‍या दिवशी सोनं महागलं, किमती 49 हजारांच्या आसपास, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो 952 रुपयांची वाढ झाली, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर पिवळ्या धातूच्या वाढीला याचा आधार मिळालाय. Gold Price

Gold Price: सलग दुसर्‍या दिवशी सोनं महागलं, किमती 49 हजारांच्या आसपास, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 6:35 PM

नवी दिल्लीः देशांतर्गत बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोने-चांदीच्या किमती (Gold-Silver Price)वाढल्यात. जागतिक मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतीत (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 285 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीही वाढली. दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो 952 रुपयांची वाढ झाली, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर पिवळ्या धातूच्या वाढीला याचा आधार मिळालाय. (Gold Price: For the second day in a row, gold prices rose to around Rs 49,000.)

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on 1 June 2021)

दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 285 रुपयांनी वाढून 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,607 रुपयांवर बंद झाले होते.

चांदीची नवीन किंमत (Silver Price on 1 June 2021)

त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 952 रुपयांनी वाढून 71,850 रुपये प्रति किलो झाला. गेल्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 70,898 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 1,912 डॉलर झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत कोणताही विशेष बदल झाला नाही आणि तो औंस 28.32 डॉलर होता.

सोन्याच्या वाढीचे कारण

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “न्यूयॉर्क कमोडिटी एक्सचेंज सीओएमएक्स (सीओएमएक्स) वर सोन्याचे स्पॉट प्राइस मजबूत झाले. यामुळे दिल्ली सराफा बाजारात मौल्यवान पिवळ्या धातूची किंमत वाढली. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, डॉलरच्या कमकुवततेमुळे सोन्याची किंमत 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.

तिसर्‍या हप्त्याची विक्री आजपासून सुरू

सॉवरेन गोल्ड बाँड स्कीमच्या (Sovereign Gold Bond Scheme) तिसर्‍या हप्त्याची विक्री आजपासून सुरू झाली. 4 जूनपर्यंत गोल्ड बाँड योजना खुली राहील. तिसर्‍या मालिकेची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,889 रुपये आहे. पहिल्या हप्त्यासाठी गोल्ड बाँडची किंमत 4,777 रुपये आणि दुसर्‍या हप्त्यासाठी 4,842 रुपये प्रति ग्रॅम आहे. डिजिटल पेमेंटवरील इश्यू किमतीवर गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल.

संबंधित बातम्या

SBI New Timing: SBI ने आजपासून शाखांच्या वेळा बदलल्या, पटापट तपासा

Bank Holiday List | जून महिन्यात 9 दिवस बँका बंद, पाहा पूर्ण यादी

Gold Price: For the second day in a row, gold prices rose to around Rs 49,000.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.