सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?
विदेशातील सराफ बाजारात सोन्याचे दर वाढल्याने भारतातही सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत (Gold price increase in India).
मुंबई : विदेशातील सराफ बाजारात सोन्याचे दर वाढल्याने भारतातही सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. दिल्लीत बुधवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 215 रुपयांनी वाढ झाली. तर एक किलो सोन्याच्या किंमतीत 1185 रुपयांनी वाढ झाली आहे (Gold price increase in India).
HDFC सिक्योरिटीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49 हजार 59 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी सोन्याचा दर 48 हजार 844 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1852 डॉलर प्रती औसवर पोहोचली आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या भावामध्येही वाढ झाली आहे. सोने बुधवारी (16 डिसेंबर) 1185 रुपयांनी महाग झाले. त्यामुळे सोन्याचे दर 63 हजार 637 रुपयांवरुन 64 हजार 822 रुपयांवर पोहोचले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 0.1 24.46 डॉलर प्रती औंसवर पोहोचले आहे (Gold price increase in India).
भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर सोन्याचे दर घसरत गेले. हे दर मंगळवारपर्यंत 48 हजार 844 रुपयांपर्यंत घसरले. पण बुधवारी हेच दर 215 रुपयांनी वाढले.
सोन्याच्या दरात उतार-चढाव का?
सोन्याच्या किंमतीत दररोज अशी अनिश्चितता का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यामागे जगावर आलेलं कोरोना संकट हेदेखील एक कारण ठरु शकतं. कोरोना संकट काळात अनेक गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे न गुंतवता सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कारण अनेकांना कोरोना संकटामुळे शेअर मार्केटमधील शेअर घसरतील, अशी भीती होती. त्यामुळे गुंतवणुकदारांना सोन्यामध्ये गुंतवणूक करणं जास्त सुरक्षित वाटत होतं.
गेल्या आठ महिन्यात गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरु केल्याने सोन्याचे दर चक्क गगनाला भिडले. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर थेट 56 हजारांवर पोहोचले होते. मात्र, कोरोना लसीबाबत जसजशा सकारात्मक बातम्या येऊ लागल्या तसतसा गुंतवणुकदारांचा गुंतवणुकीचा कल शेअर मार्केटच्या दिशेला वळू लागला. परिणामी, सोन्याचे दर पुन्हा कमी होऊ लागले. अखेर हे दर कालपर्यंत 48 हजारांवर येवून पोहोचले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतीय सराफ बाजारातही पाहायला मिळाले. भारतातही सोने-चांदीचे दर वाढले. दरम्यान, सोने-चांदीच्या दरातील हा मोठा चढ-उतार कधीपर्यंत राहील याबाबतचा अंदाज बांधणं कठीण आहे.
हेही वाचा :