Gold Silver Price : सोने 56 हजारी मनसबदार! जनतेला दिलासा नाहीच, भाव आणखी वधारणार?

Gold Price : सोन्याचा भाव विक्रमीस्तरावर, जनतेला येत्या दिवसात दिलासा मिळेल का?

Gold Silver Price : सोने 56 हजारी मनसबदार! जनतेला दिलासा नाहीच, भाव आणखी वधारणार?
सोने-चांदी वधारणार
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : जगभरात आर्थिक मंदीची (Recession) भीती कायम आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर (Gold Price Today) दिसून येत आहे. मध्यंतरी सोन्याचा भाव 50 हजार रुपयांच्या खाली घसरला होता. पण दिवाळीच्या आसपास सोन्याने पुन्हा उसळी मारली. आता तर सोन्याने 56260 रुपये प्रति 10 ग्रॅम हा विक्रम केला आहे. पण तज्ज्ञांच्या मते ही तर सुरुवात आहे. भावात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. वायदे बाजारात (MCX) सोन्याने रेकॉर्ड केला आहे. 56191 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. कॉमेक्सवर सोन्याचा भाव गेल्या 9 महिन्यात उच्चस्तरावर पोहचले आहेत. वर्षभरात सोन्याच्या किंमतीत जवळपास 17% वाढ झाली आहे.

कॉमेक्सवर सोन्याचा भाव 1913 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचला. तर चांदीची किंमती (Silver Price) 24.22 डॉलर प्रति औसवर पोहचले. देशातंर्गत बाजारात चांदीच्या किंमती 9 महिन्यांच्या सर्वात उच्चांकी स्तरावर आहेत. चांदी 69150 रुपये प्रति किलो आहेत.

IIFL SEC चे अनुज गुप्ता यांच्या मते, अमेरिकन किरकोळ महागाईच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपातीचे संकेत दिले नसले तरी आता व्याजदर एकदम वाढणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. डॉलर इंडेक्स 7 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सोने आणि चांदीच्या किंमतीत अजून वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमतींना (Gold Price) 55700 आणि 55200 रुपयांचा सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर चांदीला 67500 आणि 66000 रुपयांचा सपोर्ट मिळाला. चांदी येत्या काळात 72000 रुपये होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येणार आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकाला फायदा होणार आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.