Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा आजचे दर
सुरुवाती बाजारात MCX वर फेब्रुवारीचं वायदा सोनं (Gold) 0.04 टक्के म्हणजेच 19 रुपयांनी घसरलं. यामुळे सोन्याची किंमत कमी होत 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे.
नवी दिल्ली : घरेलू बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये (Gold Silver Price) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. MCX वर फेब्रुवारी वायदा सोन्यामध्ये (Gold) घसरणीसोबतच आजचा बाजार सुरू झाला. तर चांदीमध्ये सोन्याच्या तुलनेत हलकी तेजी आल्याचं पाहायला मिळालं. सुरुवाती बाजारात MCX वर फेब्रुवारीचं वायदा सोनं (Gold) 0.04 टक्के म्हणजेच 19 रुपयांनी घसरलं. यामुळे सोन्याची किंमत कमी होत 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. (gold price today 23 december 2020 gold and silver rates check latest rates here)
एकीकडे सोन्याच्या किंमती घसरल्या तर दुसरीकडे सोन्याच्या उलट चांदीचे भाव वधारल्याचं समोर आलं. मार्चमधील वायदा चांदी 0.06 टक्क्यांनी म्हणजेच 38 रुपये प्रति किलोग्रॅमने वधारली आहे. यामुळे एक किलोग्रॅम चांदीचा भाव 66,909 रुपयांवर गेला आहे.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मात्र सोन्याचे भाव वाढल्याचं दिसून आलं. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांच्या वाढीसह 1,863.83 प्रति औंसवर पोहोचलं आहे. इतकंच नाहीतर यूएस गोल्ड फ्यूचरचा भाव 0.1 टक्क्यांनी घसरत 1,868.10 प्रति डॉलर औंसवर आला आहे. खरंतर, अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या 900 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिल्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे ट्रेन्स सापडल्यानं सोन्याचे (Gold Price) भाव पुन्हा एकदा वधारले होते. त्यामुळे सलग सहा दिवस सोन्याचे दर वाढत होते. पण आज सोन्याचे दर घसरलेत. जळगावमध्ये सोन्याचे दर 330 रुपयांनी घसरले असून, सोने प्रतितोळा 51,295 रुपयांवर आलेत. तर चांदीच्या दरातही 2000 रुपयांची घसरण झाली असून, चांदीची किंमत प्रतिकिलो 68,619 रुपयांवर आली आहे.
आता सोन्याचा भाव प्रतितोळा 51 हजारांच्या आसपास आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हा भाव प्रतितोळा 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. कोरोनाची लस अजून बाजारात दाखल झालेली नाही. जेव्हा ही लस बाजारात दाखल होईल, लस लागू होईल, यास किमान 2021 उजाडेल. त्यामुळे तोवर सोने तेजीत राहणार आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सोन्याचे दर प्रतितोळा बाजारपेठेत 45 आणि 50 हजारांपर्यंत जाणार आहेत. (gold price today 23 december 2020 gold and silver rates check latest rates here)
इतर बातम्या –
Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: कोरोनाच्या नव्या ट्रेन्सनं सोन्याला झळाळी; जाणून घ्या तोळ्याचा भाव
Gold Price : सोने खरेदी करण्याची हीच ती वेळ?; सोनं 56000 पर्यंत जाण्याची शक्यता#GoldPrice #goldsilverpricehttps://t.co/oowGJoVnlE
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
(gold price today 23 december 2020 gold and silver rates check latest rates here)