Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने स्वस्त, भावात मोठी घसरण, पटापट तपासा
अहवालात म्हटले आहे की, 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशातील एकूण सोन्याची मागणी 94.6 टन होती. मूल्याच्या दृष्टीने समीक्षाधीन तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 37 टक्क्यांनी वाढून 59,330 कोटी रुपयांवर गेली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 43,160 कोटी रुपये होती.
नवी दिल्लीः Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय. राजधानी दिल्लीत आज सोने 271 रुपयांनी स्वस्त झाले असून, त्याचा नवा दर 46887 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदी 687 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा नवा दर 63210 रुपये प्रतिकिलो आहे.
डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या किमतीवर दबाव
गुरुवारी सोन्याचा दर 47158 रुपये, तर चांदीचा दर 63897 रुपये होता. डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) ताज्या अहवालानुसार, आर्थिक हालचालींमध्ये जोरदार वाढ आणि ग्राहकांच्या मागणीत सुधारणा झाल्यामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून 139.1 टन झाली. WGC च्या मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर परत आली आणि ती तेजीत राहण्याची अपेक्षा आहे.
सप्टेंबर तिमाहीत एकूण मागणी 94.6 टन
अहवालात म्हटले आहे की, 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशातील एकूण सोन्याची मागणी 94.6 टन होती. मूल्याच्या दृष्टीने समीक्षाधीन तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 37 टक्क्यांनी वाढून 59,330 कोटी रुपयांवर गेली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 43,160 कोटी रुपये होती.
किरकोळ खरेदीत अजूनही सुस्ती
डब्ल्यूजीसीने म्हटले आहे की, भारतात सोन्याच्या आयातीत तेजी आहे, परंतु किरकोळ खरेदी मंद आहे. आता कोरोनाचे सर्व निर्बंध झपाट्याने शिथिल केले जात असल्याने किरकोळ मागणीतही तेजी येण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, हा वेग या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी दिसणार आहे. भारतातील सोन्याची मागणी आणि लोकांचे उत्पन्न यांचा थेट संबंध असल्याचे या अहवालात म्हटलेय. उत्पन्न वाढले, कमाईत वाढ झाली, तर सोन्याची खरेदीही वाढते. कोविड महामारीमध्ये उत्पन्न संपले असून, लोकांचे उत्पन्न घटले आहे, त्यामुळे सोन्याच्या मागणीतही घट झाली आहे.
डॉलरच्या दबावामुळे सोने आणि चांदी वाढली
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीवरही दबाव आहे. यावेळी ते $6.15 (-0.34%) च्या घसरणीसह $1796.45 प्रति औंस पातळीवर व्यापार करत होते. चांदी सध्या $0.053 (-0.22%) नी घसरून प्रति औंस $24.067 वर व्यापार करत आहे. डॉलरच्या वाढीमुळे आज सोन्याच्या किमती दबावाखाली आहेत. सध्या डॉलर निर्देशांक 0.15 अंकांच्या (+0.16%) वाढीसह 93.50 वर आहे.
संबंधित बातम्या
यंदाच्या दिवाळीत चीनला 50 हजार कोटींचे नुकसान! चिनी मालावर बहिष्काराची CAIT ची अपेक्षा
Gold Price Today Before Diwali gold is cheap 29 october 2021