Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा नवे दर

यंदाच्या वर्षात मोदी सरकार स्वस्तात सोने खरेदी करण्याची शेवटची संधी देत ​​आहे. Sovereign Gold Bond ची यावर्षीची शेवटची सीरिज 29 नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि ती पाच दिवस चालेल. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 4,791 रुपये निश्चित करण्यात आली. ऑनलाईन पेमेंट केल्यावर तुम्हाला 50 रुपयांची सूटही मिळेल.

Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा नवे दर
Gold Price Today
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:20 PM

नवी दिल्ली : डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 302 रुपयांनी घसरला. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याचा भाव 302 रुपयांनी घसरून 46,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोन्याची किंमत 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.

चांदीच्या दरात 81 रुपयांची घसरण

विशेष म्हणजे चांदीचा भावही 81 रुपयांनी घसरून 61,031 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 61,112 रुपये प्रति किलो होता.

Sovereign Gold Bond: स्वस्त सोने खरेदीची संधी

यंदाच्या वर्षात मोदी सरकार स्वस्तात सोने खरेदी करण्याची शेवटची संधी देत ​​आहे. Sovereign Gold Bond ची यावर्षीची शेवटची सीरिज 29 नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि ती पाच दिवस चालेल. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 4,791 रुपये निश्चित करण्यात आली. ऑनलाईन पेमेंट केल्यावर तुम्हाला 50 रुपयांची सूटही मिळेल.

सोन्याचा नवा भाव कसा शोधायचा?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता (गोल्ड रेट कसे तपासायचे ते जाणून घ्या). यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

संबंधित बातम्या

WhatsApp वरून तुमचे डीमॅट खाते उघडा आणि IPO साठी करा अर्ज, पण कसा?

बड्या ब्रोकरेज हाऊसचा HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला, कारण काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.