Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
अनेक दिवसांपासून चांदीचा भाव सतत घसरत होता. बुधवारी चांदी 61 हजाराच्या दरम्यान व्यवहार सुरू झाला. तसेच जागतिक बाजारपेठेतही मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन सेंट्रल बॅंक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर जागतिक सोन्या-चांदीच्या दरात मागणी वाढली आहे.
मुंबई – आज जागतिक बाजाराच्या (world market) तेजीमुळे सोन्या (Gold) चांदीच्या (silver) दरात वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीवरील दरात मंदी आली होती. आज सोन्याचा दर चक्क 51 हजारांवरती गेला आहे, त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 661 रूपयांनी वाढल्याने 51,271 रूपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. आज सकाळी सोन्याचा दर 50, 921 रूपयांवर उघडला. तसेच सकाळी चांदी सुध्दा 62, 348 रूपयांवर उघडली. तात्काळ 2.38 टक्क्यांनी वाढ झाल्याने 63,840 रूपयांवर पोहोचली. काल बंद असलेल्या तुलनेत चांदीचा दर 1726 रूपयांनी वाढली आहे.
सोन्याची किंमत 0.40 टक्क्यांनी वाढली
अनेक दिवसांपासून चांदीचा भाव सतत घसरत होता. बुधवारी चांदी 61 हजाराच्या दरम्यान व्यवहार सुरू झाला. तसेच जागतिक बाजारपेठेतही मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन सेंट्रल बॅंक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर जागतिक सोन्या-चांदीच्या दरात मागणी वाढली आहे. सध्या अमेरिकेच्या बाजारात सोन्याची किंमत 0.40 टक्क्यांनी वाढली असल्याने 1,901.66 डॉलर प्रति औंस झाली आहे. काल सकाळी झालेल्या व्यवहारात सोने सुमारे 1,860 डॉलर प्रति औस विकले जात होते.
सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली
जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे. आज सकाळी चांदीच्या किमतीत 3.46 टक्क्यांनी वाढ झाली आहेय. काल चांदी 22 डॉलर प्रति औस विकत होते. आज चांदी 23. 16 डॉलर एव्हढी झाली आहे. जागतिक बाजारात डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच फेड रिझव्हर्च प्रमुख यांनी सांगितले की, अजून 0,75 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. तसेच मागच्या महिन्यात सोने अडिच हजारांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 8,800 रूपयांनी घसरली होती.