Gold Price Today: सोन्याची किंमत वाढून 47 हजारांच्या पार, चांदी स्वस्त, पटापट तपासा
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, तर चांदीच्या किमतींमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही.
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुतीमुळे आज भारतीय सराफा बाजारात म्हणजेच 14 जुलै 2021 रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) किंचित वाढ नोंदली गेलीय. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण झाली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,001 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 68,062 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, तर चांदीच्या किमतींमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही.
सोन्याची नवी किंमत (Gold Price, 14 July 2021)
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 23 पैशांचीच वाढ नोंदली गेली. शुद्ध 99.9 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत आता राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅम 47,024 रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत प्रति औंस 1,812 डॉलर झाली.
चांदीची नवी किंमत (Silver Price, 14 July 2021)
चांदीच्या किमतीत आज घसरण होत आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर बुधवारी 399 रुपयांनी घसरून 67,663 रुपयांवर आले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत फारसा बदल झाला नाही आणि तो औंस 26.02 डॉलरवर पोहोचला.
सोन्याचा भाव का वाढला?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किमती अस्थिर होत आहेत. दुसरीकडे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेच्या महागाई आकडेवारीची प्रतीक्षा करताना डॉलरने कमजोरी दर्शविली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत आहे.
संबंधित बातम्या
बनावट सिमकार्डांद्वारे फसवणूक करणे कठीण, सरकारकडून केंद्रीय डेटाबेस तयार, नवीन यंत्रणा सज्ज
HDFC नंतर आता मास्टरकार्डवर मोठी कारवाई, RBI ची नवे ग्राहक जोडण्यावर बंदी
Gold Price Today: The price of gold has crossed Rs 47,000, check the price of silver cheaply