Gold Silver Price Today : सोन्याचे भाव 10 हजार रुपयांपेक्षा कमी, पटापट तपासा नवे दर
आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. मात्र, सोमवारी सोन्याच्या किमतीत 14 रुपयांनी वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत 98 रुपये प्रति किलोने थोडी वाढ झाली.
Follow us
सोने पुन्हा महागले.
सोन्याची नवी किंमत (Gold Price 20 September 2021 ) – दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के सोने 14 रुपयांनी महाग झाले आहे. सोमवारी किमती 45,066 रुपयांवरून 45,080 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,753 डॉलर प्रति औंसवर आले आहे.
Gold / Silver Price Today
Gold Price Today
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणतात की, अमेरिकेत किरकोळ विक्रीच्या चांगल्या आकडेवारीमुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला. त्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. दुसरीकडे मोतीलाल ओसवाल उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणतात की, सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परंतु पुढील काही सत्रांमध्ये परिस्थिती सुधारू शकते.