सोने-चांदीच्या दरात सलग तिसर्या दिवशीही घसरण, तोळ्याचा दर किती?
गेल्या तीन दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 1800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
मुंबई : भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सलग तिसर्या दिवशीही घसरण सुरु आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रतितोळा 0.21 टक्क्यांनी घसरुन 48 हजार 585 रुपयांवर गेले आहेत. तर चांदीचा भाव प्रति किलो 59 हजार 460 रुपयांपर्यंत घसरला आहे. गेल्या तीन दिवसांत भारतात सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 1800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. (Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)
सोन्याचे दर सोमवारी प्रतितोळा 900 रुपये, तर मंगळवारी 750 रुपयांनी घसरले होते. तर चांदीचे दर सोमवारी प्रतिकिलो 800 आणि मंगळवारी 1,600 रुपयांनी कमी झाले होते. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 17 जुलैपासूनची सर्वात नीचांकी पातळीवर आहेत.
कोरोना लशीबाबत गुड न्यूज आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरता कमी झाल्याच्या बातमीमुळे सोने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी औपचारिकरित्या सत्तांतरण मंजूर केले. त्याचप्रमाणे संभाव्य कोव्हिड19 लसीबाबत सकारात्मक घडामोडींनंतर वॉल स्ट्रीटवर (न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज) उसळी पाहायला मिळाली. आशियाई बाजारपेठेवरही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.
यापूर्वी 9 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट कॉमेक्सवरील सोन्याच्या किमती एका दिवसात सुमारे 100 डॉलर्स म्हणजेच पाच टक्क्यांनी घसरल्या. त्यावेळीसुद्धा कोरोना लसीच्या प्रगतीच्या बातमीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाली होती.
कोरोना युगात सोने महागले
जगभरातील कोरोनाचा वाढता धोका रोखण्यासाठी उपाय म्हणून लॉकडाऊन, आर्थिक हालचालींवर निर्बंध लादण्यात आले. त्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून स्वीकारले, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. कॉमेक्सवरील सोन्याची किंमत प्रति औंस 2,089 डॉलर इतकी ऐतिहासिक उच्च पातळीवर गेली होती आणि 7 ऑगस्टला भारतातील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांवर गेली होती. (Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)
अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्रीhttps://t.co/3SHHF2Btj4
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
संबंधित बातम्या
कोरोना लसीच्या बातमीनं सोने दरात घसरण, 5 दिवसांत सोने किती रुपयांनी घसरलं?
गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स
(Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)