Gold Price Update : दिवाळीआधी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत, सध्या सोन्याचे दर स्थिर, सराफा व्यापाऱ्यांचं भाकीत

गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर घसरले आहेत, मात्र दसरा-दिवळीच्या मुहूर्तावर पुन्हा दर वाढणार असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं

Gold Price Update : दिवाळीआधी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत, सध्या सोन्याचे दर स्थिर, सराफा व्यापाऱ्यांचं भाकीत
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 6:17 PM

मुंबई: सोन्याच्या भावात घसरण झाल्याच्या अनेक बातम्या सध्या येत आहे. मात्र यंदाच्या वर्षात सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी आता दर स्थिर असल्याचं कळतं आहे. मुंबईत सोन्याचा दर स्थिर असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर घसरले आहेत, मात्र दसरा-दिवळीच्या मुहूर्तावर पुन्हा दर वाढणार असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर सोन्याचे दर उतरल्याचे अनेक मेसेज फिरत आहेत, मात्र या अफवा असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. ( Gold prices stabilize, no fall, indications of rising gold prices ahead of Diwali from gold traders. The latest price of gold)

काय आहे सोन्याच्या दराचं वास्तव?

सोन्याच्या दराबाबत आम्ही मुंबईतील सराफा व्यापारी भरत जैन यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी ते म्हणाले की, ‘पहिल्या लॉकडाऊनवेळी जो भाव होता, त्या भावापेक्षा सध्या सोन्याचा भाव कमी आहे, मात्र गेल्या काही काळात सोन्याचा भाव घसरला नाही. गेल्या 2 महिन्यात सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे, मात्र फार मोठा फरक पडलेला नाही. दररोज सोन्याच्या भावात 500 ते 700 फरक होतच असतो, लॉकडाऊनआधी सोनं 58000 ते 60000 रुपये प्रतितोळा होतं, त्या तुलनेत आता सोन्याचा दर कमी आहे.’

सोन्याची मागणी वाढणार की घटणार?

कोरोना काळात सोन्याची मागणी अचानक कमी झाली होती. लॉकडाऊनमध्ये तर दुकानंच बंद होती, परिणामी सराफा बाजारावर याचा फार मोठा परिणाम पाहायला मिळाला. अजूनही सोनं बाजाराला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र, सणांच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहक सोनं खरेदीसाठी बाहेर पडेल अशी सराफा व्यापाऱ्यांना आशा आहे. याबद्दल बोलताना सराफा व्यापारी भरत जैन म्हणाले, ‘ग्राहकांचा प्रतिसाद आता वाढताना दिसतो आहे, कित्येक महिने लोकांनी सोनं खरेदी केलेली नाही, ते लोक आता सोनं खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. आता सण-सनावळ सुरु होणार आहे, त्यामुळे सोने बाजारात पुन्हा ग्राहकाची वर्दळ वाढण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर दरांवरही परिणाम होईल’

सोन्याच्या नव्या डिझाईन्स येणार?

कोरोना संकटात सराफा बाजार पूर्णपणे बंद होता, बाजार उघडल्यानंतर दागिन्यांच्या आहे त्याच डिझाईन्स ग्राहकांना घ्याव्या लागत होत्या. नव्या डिझाईन्स बाजारात मिळत नव्हत्या. याला कारण होतं, सोन्यावर नक्षीकाम करणारे कारागीर. कोरोना काळात हे कारागीर आपापल्या गावी निघून गेले. मात्र, कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतरही अर्ध्याहून जास्त कारागीर परतलेले नाहीत. हेच पाहता बाजारात नव्या डिझाईन्सची कमतरता जाणवते. मात्र, आता कारागीर परतले असून नव्या डिझाईन्सही बाजारात आल्याचं सराफा व्यापारी भरत जैन सांगतात, ते म्हणाले, ‘सोन्याच्या नव्या डिझाईन्स लॉकडाऊनच्या काळात बनत नव्हत्या, मात्र आता पुन्हा नव्या डिझाईन्स बाजारात बनायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे कारागीर गावी गेले होते, त्यामुळे नव्या डिझाईन्स बनत नव्हत्या, मात्र, आता गावाहून 50-60 टक्के कारागीर परतले आहे, त्यामुळे नव्या डिझाईन्स पुन्हा सुरु झाल्या आहेत. ‘

सोन्याचे नवीन भाव

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत फक्त 10 रुपयांनी घट झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोनं काल 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झालं. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आणि ती 1,761 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.

चांदीचे नवीन भाव

चांदीच्या भावातही काल किंचित वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे भाव फक्त 40 रुपयांनी वाढून 58,750 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत कोणतेही लक्षणीय बदल झाले नाहीत आणि ते 22.42 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

हेही वाचा:

Post Office RD Scheme : दरमहा 10 हजार पोस्टाच्या या स्किममध्ये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर 16 लाखांचा परतावा

फाटलेल्या नोटांची चिंता सोडा, RBI हे नियम वाचा, आणि बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या!

 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.