Gold Latest Price : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे भाव

देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर (Gold rate today) आता 45 हजारांवर पोहोचला आहे.

Gold Latest Price : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे भाव
Gold Rate 5 April 2021
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 11:57 AM

मुंबई : फेडरलच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 1.20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे (Gold rate international market). एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 20.85 डॉलर (+ 1.21%) वाढीसह सकाळी 9.30 वाजता प्रति औंस 1,747.95 डॉलरवर होता. देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर (Gold rate today) आता 45 हजारांवर पोहोचला आहे. (gold rate Price today 18 march gold price rising before weddings season)

सकाळी 9.35 वाजता, एमसीएक्सवर एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 335 रुपयांनी वाढून 45175 रुपयांवर झाला. त्याचप्रमाणे जून डिलीव्हरीचे सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम पातळीवर 319 रुपयांनी वाढून 45525 रुपयांवर होते. लग्नाचा हंगाम जवळ आल्यामुळे मागणीही वाढत आहे, ज्यामुळे किंमतही बळकट होत आहे.

चांदी डिलीव्हरी किंमत

आज चांदी वधारल्याचं दिसून आलं. सकाळी 10 वाजता एमसीएक्सवरील चांदीचा भाव 753 रुपयांनी वाढून 67980 रुपये प्रतिकिलो होता. जुलैच्या डिलीव्हरीसाठी चांदीचा दर सध्या 68956 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीची किंमत मेमध्ये 0.46 (+1.78%) वाढीसह औंस 26.52 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर आहे.

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय?

देशांतर्गत बाजाराबरोबरच जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत तेजी नोंदवली गेलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1.7 टक्क्यांनी वाढलाय. तर चांदीच्या दरात थोडीशी कपात झालीय. एचडीएफसीच्या तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या जागतिक वातावरणाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही दिसून आला, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold rate Price today 18 march gold price rising before weddings season)

संबंधित बातम्या – 

Start Business in India : कमी बजेटमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास 5 आयडिया

लग्नसराईत सुरू करा बक्कळ पैसा देणार बिझनेस, एकाच दिवसात कमवाल 2 लाख रुपये

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का?, आधी चेक करा तुमच्या शहरातले दर

(gold rate Price today 18 march gold price rising before weddings season)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.