Gold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव

अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. घसरण झाली.

Gold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Silver Price Updates
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 12:51 PM

मुंबई : गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. घसरण झाली. आज एमसीएक्सवर सोन्याचे वायदा 0.33 टक्क्यांनी घसरून ते प्रति 10 ग्रॅम, 48,702 रुपयांवर स्थिरावला आहे. सोन्याच्या किंमती सलग पाचव्या दिवशी घसरल्या, आज एमसीएक्सवरील चांदीचा दर 1% ने घसरून 65,866 प्रती किलो झाला. (gold rate today down on 28 january 2021 here know the latets rates)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत स्पॉट सोन्याचे 0.3 टक्क्यांच्या घसरणीसह दर प्रति औंस 1,839.21 डॉलर होता. डॉलर निर्देशांक 0.12% वाढून 90.745 वर पोहोचला. पॉलिसी बैठकीत अमेरिकन मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह यांनी व्याज दर शून्याजवळ ठेवलं आहे.

तर चांदी 0.2% घसरून 25.18 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.2% खाली घसरून 1,063.76 डॉलरवर पोहोचलं आहे. जगातील सर्वात मोठा सोन्याचा एक्सचेंज ट्रेडेड फंड असणारी एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची धारणा बुधवारी 0.3 टक्क्यांनी घसरून 1,169.17 टन झाली.

?मुंबईतील सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47990 रुपये 24 कॅरेट सोने : 48,000 रुपये चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)

?पुणे सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 45, 990 रुपये 24 कॅरेट सोने : 48, 000 रुपये चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)

?नाशिक सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47990 रुपये 24 कॅरेट सोने : 49, 000 रुपये चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)

?नागपूर सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 990 रुपये 24 कॅरेट सोने : 48, 000 रुपये चांदीचे दर : 66900 रुपये (प्रतिकिलो)

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो. (gold rate today down on 28 january 2021 here know the latets rates)

संबंधित बातम्या – 

नोकरी बदलल्यास घरबसल्या दुसऱ्या खात्यात वळते करता येणार PF चे पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Bank Holiday February : फेब्रुवारीमध्ये 8 दिवस असणार बँका बंद, ब्रान्चमध्ये जाण्याआधी चेक करा तारखा

31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड

(gold rate today down on 28 january 2021 here know the latets rates)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.