Gold price today : ऐन महागाईत सोन्याच्या किंमती घसरल्या, वाचा आजचे ताजे दर
आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण (Gold rate) झाली आणि सुरुवातीच्या व्यापारातही दबाव वाढला.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण कार्यक्रमात (Vaccination in India) वेग वाढत असल्याने आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सलग तिसर्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीवर (Gold Silver price) दबाव आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण (Gold rate) झाली आणि सुरुवातीच्या व्यापारातही दबाव वाढला. आज सकाळी एमसीएक्समध्ये सोन्याचे एप्रिल डिलीव्हरी 127 रुपयांनी घसरले (Gold price today) प्रति दहा ग्रॅम 44730 रुपयांच्या पातळीवर उघडला. सकाळी 9.15 वाजता ते 129 रुपयांनी घसरून 44728 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर व्यापार करीत होते. (gold rate today gold silver price on 10 march 2021 know today gold rates)
MCX वरील जून डिलीव्हरी सोन्याची किंमत (Gold latest price) 108 रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 45000 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एप्रिलमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 7.20 डॉलरने घसरून 1,709.70 वर पोहोचला. चांदीच्या किंमतींमध्येही दबाव आहे. यावेळी, चांदीची किंमत 0.32 डॉलरच्या घसरणीसह 25.86 डॉलरवर होते. देशांतर्गत बाजारपेठेत मे डिलीव्हरीसाठी चांदीची किंमत 5255 रुपयांनी घसरून 66955 रुपये प्रतिकिलोवर राहिली तर जुलैच्या चांदीच्या भाव 371 रुपयांनी घसरून 68095 रुपये प्रती किलो झाला.
सोन्याच्या तेजीचे कारण काय आहे?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्यात किंचित वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला.
यावर्षी सोने 63 हजार रुपयांच्या पातळीवर जाईल
तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ही परिस्थिती जास्त काळ राहील, असे त्यांना वाटत नाही. जगातील बर्याच शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारही वाढलाय. परंतु बाजारात चढउतारही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट्स जसजसा अधिक वाढत जातोय, तसतसे नफ्यातही जोखीम देखील वाढतेय. अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नंतर सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या सोन्याकडे वळतील. तसेच सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि ते पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असा अंदाज आहे की, जर सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63,000 रुपयांच्या पातळीवर जाईल.
सध्याच्या किमतीवर आपल्याला दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळू शकेल
गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग देखील संभ्रमात आहे. त्यांना सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करणे सुरक्षित आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे. सोन्यात दीर्घ मुदतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकताो? यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किमती सध्या घसरल्याची अनेक कारणे आहेत. यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना लसीच्या लसीकरण मोहिमेतील भरभराट, नवीन लसींबद्दलची चांगली बातमी आणि आर्थिक हालचालीतील वाढ आहे. सोन्याच्या किमतींवरही त्याचा परिणाम होत आहे आणि इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने सोने स्वस्त झाले. जर डॉलरची मागणी वाढत गेली तर सोन्याच्या किमतीवर दबाव येईल.
गुंतवणूकदार अधिक धोकादायक पर्यायांकडे वळतायत
कोरोना लसीकरण वाढल्यामुळे आर्थिक हालचालींना वेग आलाय. अशा परिस्थितीत लोक अधिक जोखमीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. यामध्ये इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. त्याच वेळी सोन्याच्या किमतीतील घसरण तात्पुरती आणि अल्पकालीन आहे. म्हणूनच सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत उत्कृष्ट नफा कमावू शकतात. याउलट इक्विटी तेजीत टिकण्यास फारसा वाव नाही. तर नफा कमावून लवकरच बाहेर पडणे हा एक चांगला पर्याय असू शकेल. तज्ज्ञांच्या मते, सोने जून 2021 पर्यंत प्रति औंस 1960 डॉलरला पर्यंत जाण्याची शक्यता आहे. (gold rate today gold silver price on 10 march 2021 know today gold rates)
संबंधित बातम्या –
आता 100 रुपये स्वस्त मिळेल गॅस सिलेंडर, फक्त एक छोटसं काम करा आणि पैसे वाचवा
‘या’ ठिकाणी रोज मातीतून निघतं सोनं, किंमत वाचून तुम्हीही म्हणाल अबब…
Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर
Gold Rate Today: 8 महिन्यांत 12200 रुपयांनी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं; तोळ्याचा भाव काय?
(gold rate today gold silver price on 10 march 2021 know today gold rates)