Gold/Silver Rate Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदी 70 हजारच्या पार, आता चेक करा सोन्याचे भाव

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) एप्रिल गोल्ड (Gold Rate) फ्यूचर्सची किंमत 0.06 टक्क्यांनी वधारली असून सोन्याप्रमाणेच चांदीसुद्धा महागली आहे.

Gold/Silver Rate Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदी 70 हजारच्या पार, आता चेक करा सोन्याचे भाव
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:29 AM

मुंबई : आठवड्याच्या दुसर्‍या मंगळवारी स्थानिक बाजारात सोन्याच्या दरांमध्ये चकाकी दिसल्याचं समोर आलं आहे. तर आज चांदीची किंमत पुन्हा एकदा प्रति किलो 70 हजार रुपयांवर गेली आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) एप्रिल गोल्ड (Gold Rate) फ्यूचर्सची किंमत 0.06 टक्क्यांनी वधारली असून सोन्याप्रमाणेच चांदीसुद्धा महागली आहे. मार्च फ्यूचर्स चांदीच्या किंमतीत 0.21 टक्क्यांनी वाढ झाली. (gold silver latest price on 23 february 2021 delhi mumbai gold rate)

आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव (Gold and Silver Price on 23 February) : मंगळवारी MCX वरील एप्रिलमधील सोन्याचा वायदा भाव 0.06 टक्क्यांनी वाढला आहे म्हणजेच 28 रुपयांनी वाढला आहे आणि तो प्रति 10 ग्रॅम 46,929 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1809.57 डॉलर प्रति औंस झाली.

एमसीएक्सवरील मार्च चांदीचा वायदा 0.21 टक्क्यांनी वधारला, म्हणजे 147 रुपयांनी वाढून 70,579 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या कमकुवततेमुळे सोने आणि चांदीची चमक वाढली आहे.

गुंतवणूकदारांना 3.79 लाख कोटींचे नुकसान

काल डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 16 पैशांची वाढ नोंदली गेलीय आणि तो 72.49 च्या पातळीवर बंद झाला होता. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळला होता. 30 शेअर असलेला निर्देशांक सेन्सेक्स 1145 अंकांच्या घसरणीसह (-2.25%) 49,744 पातळीवर बंद झाला आणि 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 306 अंकांसह (-2.04%) खाली कोसळत 14675 वर बंद झाला.

16 फेब्रुवारीपासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली, जी सतत सुरू आहे. तीन आठवड्यांत प्रथमच सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली आला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य आता 200.19 लाख कोटींवर आले. गेल्या आठवड्यात ती 203.98 लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे आज गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटींचे नुकसान झाले. (gold silver latest price on 23 february 2021 delhi mumbai gold rate)

संबंधित बातम्या –

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा

Petrol Diesel Price Today: पुन्हा एकदा इंधनाचा भडका, वाचा तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझेलचे दर

(gold silver latest price on 23 february 2021 delhi mumbai gold rate)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.