Gold/Silver Rate Today: आज पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे भाव, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी किमतींमुळे एमसीएक्सवरील एप्रिलच्या वायदा सोन्याचे दर 0.54 टक्क्यांनी घसरले आहे. चांदीही आज वधारल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : आठवड्याच्या दुसर्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) घसरण झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी किमतींमुळे एमसीएक्सवरील एप्रिलच्या वायदा सोन्याचे दर 0.54 टक्क्यांनी घसरले आहे. चांदीही आज वधारल्याचं समोर आलं आहे. मार्चच्या वायदा भावामध्ये चांदीच्या किंमतीं (Silver Price Today) 1.26 टक्क्यांनी घसरल्या आहेत. (gold silver latsest rate 2 march 2021 gold price mumbai delhi kolkata)
आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव (Gold and Silver Price on 2 March 2021) : मंगळवारी एमसीएक्सवरील एप्रिल सोन्याच्या वायदा भावामध्ये किंमती 0.54 टक्क्यांनी म्हणजेच 244 रुपयांनी घसरून 45,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल वायदा सोन्याचा भाव प्रति औंस 1723 डॉलर होता.
अशात, एमसीएक्सवरील मार्च चांदीचा वायदा भाव 1.37 टक्क्यांनी कमी घसरला म्हणजेच 922 रुपये प्रतिकिलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति डॉलर 6.68 डॉलर होती.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचे भाव चेन्नईमध्ये 43,420 रुपये, मुंबईत 44,950 रुपये, दिल्लीत 45,210 रुपये, कोलकातामध्ये 45,470 रुपये, बंगळुरूमध्ये 42,100 रुपये, पुण्यात 44,950 रुपये आहेत. अहमदाबादमध्ये 45,560 रुपये, जयपूर-लखनऊमध्ये 45,210 रुपये आणि पाटण्यात 44,950 रुपये प्रति 10 ग्रॅम.
24 कॅरेट सोन्याचे दर पाटण्यात 45,950 रुपये, जयपूर-लखनौमध्ये 49,310 रुपये, अहमदाबादमध्ये 47,560 रुपये, पुण्यात 45,950 रुपये, बंगळुरूमध्ये 45,930 रुपये, कोलकातामध्ये 48,350 रुपये, दिल्लीत 49,310 रुपये, मुंबईत 45,950 रुपये आहेत. आणि चेन्नई. 47,370 प्रति 10 ग्रॅम.
सोन्याच्या किंमतीत घट होणार का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं.
“सोन्यावर आधी साडेबारा टक्के कस्टम ड्युटी होती. ती आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणली आहे. पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जी पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोनं स्वस्त होईल. आता तो फायदा सोनार ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे”, अशी भूमिका अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी मांडली. (gold silver latsest rate 2 march 2021 gold price mumbai delhi kolkata)
संबंधित बातम्या –
घरी बसल्या दिवसाला करू शकता बक्कळ कमाई, तुमच्यासाठी खास 8 बिझनेस आयडिया
Gold Prices Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; वाचे ताजे भाव
SBI मध्ये घर बसल्या 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
(gold silver latsest rate 2 march 2021 gold price mumbai delhi kolkata)