Gold Exchange: अखेर ट्रेडिंगला मुहूर्त; सेबीचे नियम जाहीर, सोमवार ते शुक्रवार ईजीआर सेगमेंट मध्ये ट्रेडिंग
ईजीआर सेगमेंटमधील ट्रेडिंगला अखेर मुहूर्त लागला. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत ट्रेडिंग करता येणार आहे. शेअर बाजार या ट्रेडिंगसाठी सकाळी 9 ते रात्री 11.55 या काळात गुंतवणुकदारांना व्यापार करता येईल.
मुंबई : देशात सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील व्यापाराचे (Gold Exchange) स्थान अखेर मजबूत झाले आहे. यातील ट्रेडिंगला अखेर मुहूर्त लागला. भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्डाने (SEBI) यापूर्वी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या बाजारात इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या पावती (EGR) म्हणून बाजारात सोन्याचा व्यापार केला जाईल. सेबीने शेअर बाजारांमध्ये इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सच्या (EGR) व्यापारासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियामक मंडळाने परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, ईजीआर सेगमेंटमधील ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार या दरम्यान होईल आणि शेअर बाजारात सकाळी 9 ते रात्री 11.55 दरम्यान व्यापार करता येईल.शेअर बाजारात ईजीआरच्या खरेदी-विक्रीशी संबंधित विविध बाबींची माहिती देत व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्क, घाऊक सौदे, किंमत श्रेणी, गुंतवणुकदार संरक्षण निधी आणि गुंतवणुकदार सेवा निधीच्या (Investor Protection Fund and Investor Service Fund) तरतुदीही सेबीने आखून दिल्या आहेत.
सेबीच्या परिपत्रकानुसार गुंतवणुकदारांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. ईजीआर व्यवहारांवर शेअर बाजारांकडून आकारण्यात येणारे शुल्क वाजवी ठेवण्याची जबाबदारी एक्स्चेंजची असेल. सेबीने सादर केलेल्या गोल्ड एक्स्चेंजच्या ब्लू प्रिंटनुसार, प्रत्यक्ष सोने जमा केल्यावर इलेक्ट्रॉनिक पावती दिली जाणार आहे. या पावत्यांचा व्यवहार गोल्ड एक्स्चेंजवर होणार आहे. ही इलेक्ट्रॉनिक पावती दाखल करून प्रत्यक्ष सोने घेता येईल.
गोल्ड एक्स्चेंजला मंजुरी
सेबी बोर्डाने 28 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत सेबीने वॉल्ट मॅनेजर्स (Wallet Manager) रेग्युलेशन्स, 2021 च्या फ्रेमवर्कला मंजुरी दिली. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) ॲक्ट, 1956 अंतर्गत ईजीआरला ‘सिक्युरिटी’ म्हणून अधिसूचित करण्यात आले, ज्यामुळे भारतात गोल्ड एक्सचेंजच्या कामकाजाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर भारतातील गोल्ड एक्स्चेंजच्या कामकाजाची चौकटही जाहीर करण्यात आली.
सध्या मान्यता प्राप्त झालेल्या शेअर बाजारांमध्ये ईजीआरच्या व्यापाराच्या विविध पैलूंचा तपशील निर्दिष्ट करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजने ट्रेडिंग टाइम, ट्रान्झॅक्शन फी, ब्लॉक्स आणि होलसेल डील्स, प्राइस बँड, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (IPF) आणि इन्व्हेस्टर सर्व्हिस फंड आणि युनिक क्लायंट कोड यांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती.
जाणून घ्या खास फीचर्स
ईजीआर सेगमेंटमध्ये ट्रेडिंगला सोमवार ते शुक्रवारपर्यंत परवानगी असेल. सेबीच्या परिपत्रकानुसार, शेअर बाजार आपल्या ट्रेडिंगची वेळ सकाळी 9.00 ते रात्री 11:30 पर्यंत असेल. ही वेळ रात्री 11:55 पर्यंत वाढू शकेल.
भारतीय दिनदर्शिकेप्रमाणे सुट्टीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय शेअर बाजार सुरू असेल तर गोल्ड एक्सचेंज संध्याकाळी 5 वाजेनंतर सुरू ठेवण्याची परवानगी मिळू शकते.
प्री-ओपन सत्र 15 मिनिटांच्या कालावधीसाठी असेल – सकाळी 8:45 ते सकाळी 9:00 पर्यंत, त्यापैकी ऑर्डर एन्ट्री, ऑर्डर रिव्हिजन आणि ऑर्डर कॅन्सलेशनसाठी 8 मिनिटांची परवानगी असेल, ऑर्डर मॅचिंग आणि ट्रेडसाठी 4 मिनिटे आणि उर्वरित 3 मिनिटे प्री-ओपन सत्र ते सामान्य बाजारापर्यंत ट्रान्समिशन सुविधेसाठी राखीव असेल.
संबंधित बातम्या
एबीजी महाघोटाळा मनमोहन सरकारचं पाप, यूपीए काळातच खाती NPA; निर्मला सीतारमणांचा दावा
GOLD PRICE TODAY: 50 हजारांचा टप्पा पार, मुंबई ते नागपूर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे भाव