Gold Price Today : आज पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, पटापट चेक करा ताजे दर
शुक्रवारी एमसीएक्सवरील (MCX) 10 ग्रॅम सोन्याचा वायदा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 44,904 रुपयांवर पोहोचला आहे तर चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 रुपये प्रति किलो झाला.
नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) घसरल्या आहेत. ज्यामुळे आज सुरुवातीच्या व्यापारात सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांपेक्षा खाली आल्या. शुक्रवारी एमसीएक्सवरील (MCX) 10 ग्रॅम सोन्याचा वायदा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 44,904 रुपयांवर पोहोचला आहे तर चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 रुपये प्रति किलो झाला. (gold silver price today drop gold prices rs 11000 new rates)
मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 105 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर चांदीची किंमत प्रति किलो एक हजार रुपयांपर्यंत वाढताना दिसून आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, 2020 च्या ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.
सोन्याची आजची किंमत (Gold Price) :
शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,904 रुपयांवर पोहोचले. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत 105 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 9 महिन्यांच्या नीचांकावर आहेत. सोन्याचे दर आज 0.4% ने कमी होऊन ते प्रति औंस 1,730.06 डॉलरवर गेले.
आजची चांदी किंमत (Silver Price) :
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 प्रति किलो झाला. तर गुरुवारी चांदी 1000 रुपयांनी महागली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.6 % घसरून 25.89 वर आणि प्लॅटिनम 0.7 % घसरून 1,198.19 वर बंद झाला.
सोन्याच्या वाढीची कारणे
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किमती 105 रुपयांनी वाढल्यात. यामुळे जागतिक सोन्याच्या किमतींमध्ये एका रात्रीत वाढ दिसून आली. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, डॉलरवरील वाढत्या दबावामुळे सोन्याला मजबुती मिळाली. दोन दिवसांच्या धोरणात्मक बैठकीनंतर यूएस फेडने गुंतवणूकदारांना खात्री दिली की, 2023 पर्यंत आपला मूलभूत व्याजदर शून्याजवळ राहील. गुरुवारी COMEX (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) येथे सोन्याच्या किमती किरकोळ घसरून 1,738 डॉलर प्रति औंस झाल्या, असंही तपन पटेल यांनी सांगितले.
100 रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करा
मायक्रो सेव्हिंग फिनटेक प्लॅटफॉर्म सिप्लीने (Siply) सिप्ली गॅरंटीड गोल्ड सेव्हिंग्ज योजना सुरू केली. यामध्ये दर आठवड्याला किमान 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. यामध्ये गुंतवणूकदारास तीन महिन्यांत 10% जादा सोने मिळू शकेल, तर बहुतेक दागिन्यांनी (11-12 महिन्यांपर्यंत) देऊ केलेल्या योजनांमध्ये सध्याचा बाजार दर 8.33% आहे. (gold silver price today drop gold prices rs 11000 new rates)
संबंधित बातम्या –
सोन्याचे जुने दागिने अगदी नव्यासारखे चमकतील, फक्त करा एक काम
‘या’ कार्डवर काहीही खरेदी केल्यास मिळेल कॅशबॅक, वाचा काय आहेत फीचर्स
ट्रेन तिकीट बुक करताना स्वस्तात बूक करा हॉटेल, IRCTC कडून धमाकेदार ऑफर
(gold silver price today drop gold prices rs 11000 new rates)