Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदी घसरली; वाचा आजचे ताजे दर
एनसीएक्सवर 4 जूनच्या प्रति दहा ग्रॅम वायदा सोन्यावर 57 रुपयांची तेजी दिसून आली आहे. 57 रुपयांच्या वाढीसह सोनं प्रति दहा ग्रॅम 44,992 रुपयांवर पोहोचलं आहे.
नवी दिल्ली : गुरुवारी सुरुवातीच्या व्यापार सत्रात एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किंमती चढ-उतार होताना दिसत आहे. एनसीएक्सवर 4 जूनच्या प्रति दहा ग्रॅम वायदा सोन्यावर 57 रुपयांची तेजी दिसून आली आहे. 57 रुपयांच्या वाढीसह सोनं प्रति दहा ग्रॅम 44,992 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर चांदीचे दर 254 रुपयांनी घसरत आहेत. 254 रुपयांच्या घसरणीसह त्याची किंमत प्रति किलो 63614 रुपये पातळीवर व्यापार करत असल्याचे दिसते. (gold silver price today know the rate of 10 gram gold Mcx Price)
दिल्ली बुलियन बाजाराबद्दल बोलताना बुधवारी सोन्याचा भाव 49 रुपयांनी घसरून 43925 रुपये प्रति दहा ग्राम पातळीवर बंद झाला. मंगळवारी प्रति दहा ग्रॅम 43974 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. सराफा बाजारात चांदीच्या भावातही घट झाली. तो 331 रुपयांनी घसरून 62441 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी तो 62,772 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.
सोन्या-चांदीत चढ-उतार
परदेशी बाजाराच्या मिश्रित सिग्नलचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. त्याचबरोबर बुधवारीच्या व्यापार सत्रातही डॉलर निर्देशांकाच्या वाढीचा परिणाम डॉलरच्या निर्देशांकातील 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, 10 वर्षांच्या यूएस बाँडचं उत्पन्न देखील 1.728 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. 30 मार्च रोजी ते 1.77 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचले जे जानेवारी 2020 नंतरचे सर्वोच्च आहे.
सोने का झाले स्वस्त?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. डॉलरच्या मजबुतीदरम्यान न्यूयॉर्कमधील सध्याच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये लोकांनी जोरदार विक्री केली. यासह सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
येत्या काही दिवसांत चांगला परतावा मिळेल
गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच चांगला पर्याय ठरला आहे. असे सांगितले जात आहे की, पुन्हा सोन्याच्या किमती गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार, सध्या सोनं चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीनं उच्च विक्रम नोंदविला आहे. परंतु या क्षणी सोने ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकडून सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. 2021च्या शेवटी सोन्यामध्ये पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. (gold silver price today know the rate of 10 gram gold Mcx Price)
संबंधित बातम्या –
आजपासून बदलले महत्त्वाचे नियम, गॅस सिलेंडर ते हवाई प्रवासामध्ये मोठे झाले बदल
PNB च्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा, आता पुढच्या तीन महिन्यासाठी टेन्शन नाही