Gold Silver Price Today: नवरात्रीपूर्वीच सोने खरेदीची संधी, एका दिवसात 200 रुपयांहून अधिक स्वस्त, पटापट तपासा

एचडीएफसी सिक्युरिटीज कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणतात की, जगातील अर्थव्यवस्था स्थिर प्रगती करीत आहेत. त्यामुळेच सामान्य माणसाचा कल आता शेअर बाजाराकडे वळलाय. त्यामुळेच सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,750 रुपयांनी घट झाली.

Gold Silver Price Today: नवरात्रीपूर्वीच सोने खरेदीची संधी, एका दिवसात 200 रुपयांहून अधिक स्वस्त, पटापट तपासा
Gold Price Today
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 4:57 PM

नवी दिल्लीः Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त झालेय. दिल्ली सराफा बाजारात किंमत 226 रुपयांनी कमी झाली. त्याचबरोबर या काळात चांदी 462 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये मागणी वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींना खालच्या पातळीवर आधार मिळू शकतो. मात्र, सोन्यात मोठी तेजी येण्याची आशा नाही. कारण आंतरराष्ट्रीय किमती सतत घसरत आहेत.

सोन्याची नवी किंमत – (सोन्याची किंमत आज, 6 ऑक्टोबर 2021)

एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेचे सोने दिल्लीत 226 रुपयांनी कमी होऊन 45,618 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात किमती घसरून 1,747 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीची नवी किंमत- (चांदीची किंमत आज, 6 ऑक्टोबर 2021)

सोन्याप्रमाणे चांदीचे दरही कमी झालेत. एक किलो चांदीची किंमत 462 रुपयांनी घसरून 59341 रुपये झाली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात किमती 22.35 डॉलर प्रति औंस झाली.

सोने स्वस्त का होत आहे?

एचडीएफसी सिक्युरिटीज कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणतात की, जगातील अर्थव्यवस्था स्थिर प्रगती करीत आहेत. त्यामुळेच सामान्य माणसाचा कल आता शेअर बाजाराकडे वळलाय. त्यामुळेच सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,750 रुपयांनी घट झाली. ज्वेलरी सोन्याची किंमत जानेवारीमध्ये 45,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर या महिन्यात त्याची किंमत 42,500 रुपयांपर्यंत खाली आली. किमती घसरल्याने मागणीला आधार मिळाला. याशिवाय मोठे सण पुढे आहेत, त्यामुळे ज्वेलर्सनी सोने खरेदी केले आहे.

आता पुढे काय?

सोन्याची आयात वाढवण्याचा ट्रेंड ऑक्टोबरमध्येही कायम राहू शकतो. हा महिना दसरा आणि नंतर पुढचा महिना दिवाळी आहे. दरम्यान, सोने खरेदी करताना अनेक प्रसंग शुभ मानले जातात. या महिन्यात अधिक सोने आयात केले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागणी मजबूत राहील, त्यामुळे किमती वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Cabinet Decision Updates: वस्त्रोद्योगासाठी मोठी घोषणा, MITRA योजनेंतर्गत 4445 कोटी मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनसची आज घोषणा होणार, किती पैसे मिळणार?

Opportunity to buy gold before Navratri, cheaper than Rs 200 a day, check it out

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.