Gold Silver Price Update | Israel -Palestine Crisis मुळे सोने-चांदीला चमक, शेअर बाजार ढेपाळले 

Gold Silver Price Update | दहशतवादी संघटना हमासने इस्त्राईलवर हल्ला चढविल्याचे परिणाम 24 तासातच विविध भागात दिसायला सुरु झाले आहेत. अगोदरच जग मंदीच्या विळख्यात आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपलेले नाही. तर आता इस्त्राईल-पॅलेस्टाईनचा संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Gold Silver Price Update | Israel -Palestine Crisis मुळे सोने-चांदीला चमक, शेअर बाजार ढेपाळले 
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 3:23 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलशी युद्ध उकरुन काढले आहे. जगावर अगोदरच संकटांची मालिका सुरु आहे. कोरोनाच्या सावटातून कसंबसं बाहेर पडलेल्या जगावर रशिया-युक्रेन युद्धाने परिणाम केला. जवळपास दीड वर्षांपासून ही उलथापालथ सुरु आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात आहे. आता पॅलेस्टाईनने इस्त्राईलसोबत वाद उकरुन (Israel Palestine Crisis) काढला आहे. त्याचा परिणाम लागलीच सोन्यासह चांदीवर दिसून आला. गेल्या एक आठवड्यापासून दोन्ही धातूंचे दर (Gold Silver Rate)घसरणीवर होते. पण कालच्या हल्ल्यानंतर लागलीच सोने-चांदी चमकली. अमेरिकेसह युरोपने इस्त्राईलला पाठिंबा दिला आहे. त्याचे परिणाम दिसत आहे.

मोठे नुकसान

अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर हमासने 5 हजार रॉकेटचा मारा केला. वादाची किनार जुनीच असल्याने इस्त्राईली लष्काराने पण ताबडतोब प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात 24 तासात दोन्ही बाजूचे जवळपास 600 लोकांना प्राण गमवावा लागला. दोन्ही बाजूचे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. इस्त्राईलमध्ये भारताचे 18 हजार नागरिक राहतात. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचे आणि सतर्कतेच्या सूचना भारतीय दुतावासाने दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अचानक आली तेजी

गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोन्यात अचानक तेजी आली. सोन्यात जवळपास 300 रुपयांची दरवाढ दिसून आली. 22 कॅरेट सोने 52,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीत ही मोठी घसरण सुरु होती. पण युद्ध भडकल्यानंतर लागलीच भाव वाढ झाली. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,100 रुपये आहे.

स्टॉक मार्केटवर परिणाम

रविवारी परदेशी शेअर बाजारावर या हल्ल्याचे परिणाम दिसून आले. हे बाजार काही वेळेसाठी रविवारी सुरु असतात. इस्त्राईलच्या मुख्य TA-35 stock index तर 5.2 टक्क्यांनी घसरला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात निच्चांकी घसरण आहे. रियाधमधील Tadawul All Share Index मध्ये 1.2 टक्क्यांची घसरण झाली. कुवेत, कतार, ओमान, बहरीन आणि इजिप्तमधील शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु होते. त्याचा परिणाम आता जगभभरातील बाजारावर दिसणार आहे. भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम सकाळीच दिसण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.