गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या दहा ग्रॅम (Gold Rate) 217 रुपयांवर घसरला. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली. एक किलो चांदीची किंमत (Silver Price) 1,217 रुपये झाली.
दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची वॅक्सिन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरतील.
एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, डॉलरची मजबुती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये वाढ यामुळे सोन्यावर मोठा दबाव निर्माण झाला. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
गुरुवारी सोन्याची किंमत (Gold Price on 4 March 2021) - दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याची किंमत 44,589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर घसरली. अशा प्रकारे सोन्याच्या किमती 217 रुपयांनी खाली आल्यात.
गुरुवारी चांदीचा दर (Silver Price on 4 March 2021) - त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती.
Gold Rate Today