Gold Silver Rate Today : ऑक्टोबरची सुरुवातच स्वस्ताईने, इतके उतरले सोने-चांदी

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच स्वस्ताईची वार्ता आणली. गेल्या आठवड्यापासून दोन्ही धातूत मोठी घसरण झाली. पितृपक्ष असतानाही भावात घसरण झाल्याने जळगाव सराफा बाजारात एकच गर्दी दिसून आली. इतर सराफा बाजारातही गुंतवणूकदारांनी खरेदी केली.

Gold Silver Rate Today : ऑक्टोबरची सुरुवातच स्वस्ताईने, इतके उतरले सोने-चांदी
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 8:44 AM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीने घसरणीची आनंदवार्ता आणली. या आठवड्यात मौल्यवान धातूत स्वस्ताई आली. या आठवड्याच्या सोन्याचा भाव 25 सप्टेंबर रोजी 59,104 रुपये होता. हा भाव झरकन उतरुन 30 सप्टेंबर रोजी 57,719 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरला. एकाच आठवड्यात सोने 1,385 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीने घसरणीतही एक हजारांची मुसंडी मारल्याने स्वस्ताई थोडा सुरुंग लागला. अमेरिकत शटडाऊन झाले तर सोने-चांदीवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता आहे. आता हे शटडाऊन किती दिवस असेल हे समोर आलेले नाही. पितृपक्ष असल्याने सोने-चांदीची (Gold Silver Price Today 1 October 2023) खरेदी मंदावली आहे. पण जळगाव सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. भावात इतका फरक दिसून आला आहे.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही. इतर दिवशी असोसिएशन भाव जाहीर करते. या भावात शहरानुसार आणि करानुसार तफावत दिसून येते.

हे सुद्धा वाचा

सोन्याला सुरुंग

  1. गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्यात मोठी घसरण
  2. 15 ते 19 सप्टेंबर या काळातच सलग तेजीचे सत्र, 700 रुपयांनी वधारले सोने
  3. 26 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या
  4. 27 सप्टेंबर रोजी 250 रुपयांनी सोने स्वस्त झाले
  5. 28 सप्टेंबर रोजी सोन्याने 650 रुपयांची स्वस्ताई
  6. 29 सप्टेंबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरले.
  7. 30 सप्टेंबर रोजी सोने 300 रुपयांनी झाले स्वस्त
  8. 22 कॅरेट सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,350रुपये प्रति 10 ग्रॅम भाव

चांदीत पण पडझड

  1. सप्टेंबर महिन्यात चांदीने मोठी मजल मारली नाही
  2. सुरुवातीलाच चांदीत 5000 रुपयांची घसरण
  3. 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या
  4. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली
  5. 26 सप्टेंबर रोजी 1000 रुपयांनी भाव घसरला
  6. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली
  7. 29 सप्टेंबर रोजी चांदीत हजार रुपयांची वाढ
  8. 30 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची घसरण
  9. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,719 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,488 रुपये, 22 कॅरेट सोने 52,871 रुपये, 18 कॅरेट 43,289 रुपये, 14 कॅरेट सोने 33,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,603 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.