Gold Silver Rate Today 10 January 2025 : सोन्याची दणक्यात सुरुवात, चांदीची वाट हरवली, काय आहेत आज किंमती?

Gold Silver Rate Today 10 January 2025 : सोन्याने या आठवड्यातही दरवाढीची सलामी दिली. सोने दोन दिवसांत 500 रुपयांच्या घरात पोहचले. तर चांदी चाचपडताना दिसली. चांदीला अजून सूर गवसला नाही. सोमवारी चांदी हजार रुपयाने वधारली होती.

Gold Silver Rate Today 10 January 2025 : सोन्याची दणक्यात सुरुवात, चांदीची वाट हरवली, काय आहेत आज किंमती?
सोने आणि चांदीचा भाव काय?
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 8:27 AM

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने धमाका केला होता. सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2 हजार रुपयांनी महागली होती. दरवाढीला ब्रेक देत या आठवड्यात सोन्याने पुन्हा घोडदौड सुरू केली. तर चांदीला अजून सूर गवसला नाही. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदी हजार रुपयांनी महागली होती. गेल्या तीन दिवसात चांदीची किंमत स्थिर आहे. बजेटनंतर काही तज्ज्ञ सोने आणि चांदी जीएसटी कमी झाल्याने स्वस्त होण्याची शक्यता वर्तवत आहेत. तर काही तज्ज्ञ सोने 90 हजारी सलामी देईल. तर चांदी 1 लाख 10 हजारांच्या घरात पोहचेल, असा अंदाज वर्तवत आहेत. असा आहे या बेशकिंमती धातुचा भाव (Gold Silver Price Today 10 January 2025 )

सोन्याची जबरदस्त बॅटिंग

सोन्याने गेल्या आठवड्यात 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली होती. तर या सोमवार, मंगळवारी भाव स्थिर होता. बुधवारी सोने 100 रुपयांनी तर गुरुवारी 380 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा भाव स्थिर

मागील आठवड्यात चांदी 3 जानेवारी रोजी 2 हजारांनी वधारली तर 4 जानेवारीला 1 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वधारली. तीन दिवसांपासून या धातुत कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,618, 23 कॅरेट 77,307, 22 कॅरेट सोने 71,098 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,214 रुपये, 14 कॅरेट सोने 45,407 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,800 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.