AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची उसळी, ग्राहकांच्या उत्साहावर पडले विरजण

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने युटर्न घेतल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. लग्नसराईत सोने खरेदी करण्याची अनेकांनी योजना आखली. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. घसरणीनंतर सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. असा आहे या मौल्यवान धातूंचा भाव...

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची उसळी, ग्राहकांच्या उत्साहावर पडले विरजण
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 8:42 AM

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमती पुन्हा वधारल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. लग्नसराईत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा पेठांकडे धाव घेतली. गुरुवारी सोने-चांदीने अचानक युटर्न घेतला. सोन्याच्या भावात थेट एक हजार तर चांदीत अडीच हजार रुपयांची वाढ झाली. दिवाळीपासून सोने-चांदीने आगेकूच सुरु ठेवली. या महिन्याच्या सुरुवातीला या दरवाढीला मोठा ब्रेक लागला. या आठवड्यात पण तीन दिवस भावात मोठी घसरण झाली. गुरुवारपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत जोरदार उसळी आली. काही दिवसांत सोने पुन्हा रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  असे आहेत सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price Today 16 December 2023)

सोन्याची मुसंडी

या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोने प्रत्येकी 220 रुपये, बुधवारी 13 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी उतरले. 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली. 15 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 3500 रुपयांनी सूसाट

आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गुरुवारी चांदीने 2500 रुपयांची उसळी घेतली. 15 डिसेंबर रोजी चांदीत एक हजारांची वाढ झाली. या दोन दिवसांच्या दरवाढीमुळे चांदीची किंमत 3500 रुपयांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,367 रुपये, 23 कॅरेट 62,117 रुपये, 22 कॅरेट सोने 57,128 रुपये झाले. 18 कॅरेट 46,775 रुपये, 14 कॅरेट सोने 36,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,273 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.