AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 16 February 2025 : सोनेच नाही तर चांदीचा लांब पल्ला, खरेदीसाठी खिसा खाली होणार, किंमत तर जाणून घ्या

Gold Silver Rate Today 16 February 2025 : सोने आणि चांदीने आठवड्यात मोठी भरारी घेतली. चांदीने तर लाखाचा टप्पा ओलांडला. सोन्याची 90 हजारी घोडदौड सुरू झाली आहे. या दरवाढीने ग्राहकांचा खिसा खाली होणार आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 16 February 2025 : सोनेच नाही तर चांदीचा लांब पल्ला, खरेदीसाठी खिसा खाली होणार, किंमत तर जाणून घ्या
सोने आणि चांदी
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 8:36 AM

सध्याच्या बदलत्या जागतिक समिकरणांमुळे सोने आणि चांदीने गेल्या वर्षीप्रमाणेच मोठे विक्रम नावावर नोंदवायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या बजेटनंतर दोन्ही धातुत मोठी घसरण झाली होती. कर कपात हे त्यामागील कारण होते. या बजेटमध्ये या दोन्ही धातुसाठी आणि ग्राहकांसाठी सरकारने कोणताच दिलासा दिला नाही. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित व्यापारी धोरणांचा फटका बाजाराला बसला आहे. धास्तावलेल्या जागतिक गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातुकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे किंमतीत मोठी वृद्धी दिसून येत आहे. या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी तर चांदी हजाराने वधारली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशा आहेत किंमती…(Gold Silver Price Today 16 February 2025 )

सोन्याची मोठी घोडदौड

या आठवड्यात सोने जवळपास 1200 रुपयांनी वधारले आणि 700 रुपयांनी स्वस्त झाले. सोमवारी 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी सोने महागले. तर बुधवारी 710 रुपयांनी दर आपटले. गुरुवारी त्यात 400 तर शुक्रवारी 100 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 1 लाखाच्या पुढे

5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते 14 तारखेपर्यंत चांदीत मोठा बदल दिसला नव्हता. तर 14 फेब्रुवारी चांदीने दरवाढीचा व्हॅलेंटाईन साजरा केला. एक हजाराने किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,998, 23 कॅरेट 85,654, 22 कॅरेट सोने 78,774रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,499 रुपये, 14 कॅरेट सोने 50,309 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,953 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?.
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.