Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा चढाई, दोन दिवसांत असा बदलला भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना दणका दिला. दोन दिवसांपासून दोन्ही धातूंनी चढाई केली आहे. किंमतीत इतका बदल झाला आहे. त्यामुळे खिशा अधिक खाली करावा लागणार आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा चढाई, दोन दिवसांत असा बदलला भाव
Image Credit source: weddingwire
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : जागतिक संकेतला तुडवत सोने-चांदीने चढाई केली. रविवारी सोने-चांदी खरेदीचे नियोजन करत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. गेल्या दोन दिवसांपासून मौल्यवान धातू झरझर चढले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात, 21 ऑगस्टपासून दोन्ही धातूंनी कमाल दाखवली होती. सप्टेंबर महिन्यात त्यांची जादू चालली नाही. सोने-चांदीत मोठी पडझड झाली. त्यामुळे किंमती 60,000 रुपयांहून थेट 58,000 रुपयांच्या जवळपास येऊन आपटल्या. जागतिक बाजार सोने-चांदीला अनुकूल नसल्याचे चित्र आहे. तर आशियातील बाजारात सोने-चांदी वधारले आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला. दोन दिवसांत सोने-चांदीने (Gold Silver Price Today 17 September 2023) मोठी झेप घेतली. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

हे सुद्धा वाचा

सोन्यात चढउतार

  • गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
  • गेल्या पंधरा दिवसांत तर घसरणीचे सत्र सुरु होते. शुक्रवारी त्याला ब्रेक लागला.
  • 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली.
  • त्यापूर्वी सोन्यात जवळपास 800 रुपयांची स्वस्ताई आली होती.
  • 13 सप्टेंबर रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले होते.
  • त्यापूर्वी किंमती जवळपास 400 रुपयांनी उतरल्या होत्या.
  • 22 कॅरेट सोने 55050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60040 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदीची 1200 रुपयांची चढाई

सप्टेंबर महिन्यात चांदीत 5000 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या पंधरा दिवसांत चांदीत घसरणीचे सत्र होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची दरवाढ झाली. त्यापूर्वी चांदीची चमक फिकी पडली होती. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,016 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,780 रुपये, 22 कॅरेट सोने 54059 रुपये, 18 कॅरेट 44,262 रुपये, 14 कॅरेट सोने 34,524 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,853 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.