AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा भाव वधारला, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

Gold Silver Rate Today : गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत पडझड झाली. नंतर भाव वधारले. या आठवड्याची सुरुवात दरवाढीने झाली. दोन्ही धातू चमकले. ग्राहकांच्या खिशाला किंमती वधारल्याने झळ बसणार आहे. अमेरिकेतील अनुकूल घडामोडींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर दिसून येईल.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा भाव वधारला, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 8:42 AM

नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीने उसळी घेतली होती. सुरुवातीचे सलग तीन दिवस पडझडीचे सत्र सुरु होते. त्यानंतर भावात वाढ झाली. लग्नसराई असल्याने सराफा बाजारात गर्दी आहे. सोने-चांदीचे भाव वधारल्याने ग्राहकांना सोने खरेदी करताना आता विचार करावा लागत आहे. दिवाळीपासून मौल्यवान धातूत तेजीचे सत्र सुरु आहे. किंमतींनी डिसेंबर महिन्यात अनेक रेकॉर्ड तोडले आणि विक्रम नावावर नोंदवले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या मौल्यवान धातूंनी दरवाढीची सलामी दिली. अशा वधारल्या सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 19 December 2023)

सोने वधारले

आठवड्याच्या सुरुवातीला 19 डिसेंबर रोजी सोन्याने दरवाढीची सलामी दिली. सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. गेल्या आठवड्यात सुरुवातीला सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर सोने 1100 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 300 रुपयांनी वधारली

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीने 3500 रुपयांची उसळी घेतली होती. 16 डिसेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची घसरण झाली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,902 रुपये, 23 कॅरेट 61,654 रुपये, 22 कॅरेट सोने 56,702 रुपये झाले. 18 कॅरेट 46,427 रुपये, 14 कॅरेट सोने 36,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,588 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.