सोने 70 हजारांच्या घरात, तर चांदीने पण मारली मुसंडी; सराफा बाजारात किंमती एकदम तेजीत

Gold Silver Rate Today 2 April 2024 | सोने आणि चांदीने एप्रिलच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना फूल केले नाही तर जोरदार झटका दिला. सोने एकाच दिवसात 1000 रुपयांनी वधारले तर चांदीने पण कमाल दाखवली. दरवाढीने चांदी 78,600 रुपयांच्या घरात पोहचली. आता मौल्यवान धातूंच्या काय आहेत किंमती?

सोने 70 हजारांच्या घरात, तर चांदीने पण मारली मुसंडी; सराफा बाजारात किंमती एकदम तेजीत
सोने वधारले, चांदी पण नाही मागे
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:44 AM

सोने आणि चांदीने एप्रिलच्या पहिल्याच दिवशी टॉप गिअर टाकला. मार्च महिन्यात मौल्यवान धातूंनी जोरदार मुसंडी मारल्यानंतर एप्रिलच्या पहिल्याच दिवशी महिनाभराचे भाकित मांडले. पहिल्याच दिवशी सोने 1000 रुपयांनी तर चांदी किलोमागे 600 रुपयांनी वधारली. मार्च महिन्यातच सोन्याने अनेक शहरात जीएसटीसह 70 हजारांचा टप्पा गाठला. तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातूंनी घेतलेली भरारी ग्राहकांच्या काही पचनी पडली नाही. अनेकांनी खरेदीचा बेत रद्द केला वा कमी खरेदी केली. आता सोने आणि चांदीच्या काय आहेत (Gold Silver Price Today 2 April 2024) किंमती?

सोने सूसाट

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सोने 2000 रुपयांनी वधारले होते. तर त्यात 400 रुपयांची घसरण नोंदवली गेली. 29 मार्च रोजी सोन्याने 1300 रुपयांची विक्रमी उडी घेतली होती. 30 मार्च रोजी त्यात 250 रुपयांची घसरण आली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने टाकला टॉप गिअर

गेल्या आठवड्यात चांदीने 1100 रुपयांची भरारी घेतली. तर 600 रुपयांची घसरण झाली. 27 मार्च रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. तर 28 आणि 29 मार्च रोजी सलग 300 रुपयांची वाढ झाली. 30 मार्च रोजी किंमती 200 रुपयांनी वधारल्या. 1 एप्रिल रोजी भाव 600 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 78,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 68,663 रुपये, 23 कॅरेट 68,388 रुपये, 22 कॅरेट सोने 62,895 रुपये झाले.18 कॅरेट 51,497 रुपये, 14 कॅरेट सोने 40,168 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,111 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

जागतिक बाजारात मोठी झेप

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात सोने मजबूत स्थितीत पोहचले. परिणामी देशाची राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 1,070 रुपयांनी वधारला. सोने 68,420 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. गेल्या व्यापारी सत्रात सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदीच्या किंमतीत 1,120 रुपयांची तेजी आली आहे. चांदी 78,570 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली आहे. तर गेल्या व्यापारी सत्रात हा भाव 77,450 रुपये प्रति किलोग्रॅम होता. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहे. मे महिन्यात हा बदल दिसू शकतो. त्यानंतर सोने आणि चांदी रॉकेटवर स्वार होण्याची शक्यता आहे.

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.