AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 2 August 2024 : सोने-चांदीने तोडला रेकॉर्ड, आता 10 ग्रॅमसाठी खाली करा खिसा, ग्राहकांना मोठा झटका

Gold Silver Rate Today 2 August 2024 : सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूंनी मोठी भरारी घेतली. आता 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना खिसा खाली करावा लागणार आहे. किती वाढल्या किंमती?

Gold Silver Rate Today 2 August 2024 : सोने-चांदीने तोडला रेकॉर्ड, आता 10 ग्रॅमसाठी खाली करा खिसा, ग्राहकांना मोठा झटका
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 8:30 AM

श्रावण महिन्याच्या अगोदरच सोने आणि चांदीने विक्रमी भरारी घेतली. जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी तुफान फटकेबाजी केली. चांदीने तर बुधवारी मोठी झेप घेतली. तर सोन्याने दोनच दिवसांत दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले. बजेटनंतर पहिल्यांदाच दोन्ही धातूत विक्रमी भाववाढ पाहायला मिळाली. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. या आठवड्यातच किंमतीत मोठा ‘खेला’ झाला. काय आहेत आता मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 2 August 2024 )

सोन्याची तुफान चढाई

बजेटपूर्वी आणि नंतर ही अनेक दिवस सोन्यात मोठी उलाढाल दिसली नाही. पण या आठवड्यात बेशकिंमती धातूने मोठी कमाल दाखवली. 29 जुलै रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. मंगळवारी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. 31 जुलै रोजी सोन्याने 870 रुपयांची विक्रमी भरारी घेतली. 1 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतींनी 540 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,051 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची विक्रमी झेप

बजेटपूर्वी आणि नंतर चांदी दणकावून आपटली होती. या आठवड्यात 29 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी भाव तितकेच घसरले. 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची भरारी घेतली. 1 ऑगस्ट रोजी चांदीत 600 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,721, 23 कॅरेट 69,442, 22 कॅरेट सोने 63,864 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,291 रुपये, 14 कॅरेट सोने 40,787 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 83,464 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.