Gold Silver Rate Today | आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीला बहर; ग्राहकांच्या खिशाला बसणार मोठी झळ

Gold Silver Rate Today 2 March 2024 | या आठवड्यात कायम घसरणीवर असलेल्या सोन्याने आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना मोठा दणका दिला. चांदीत चढउताराचे सत्र होते. आठवड्याच्या शेवटी किलोमागे चांदी 600 रुपयांनी महागली. सराफा बाजारात जाणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला वाढलेल्या किंमतींमुळे कात्री लागणार आहे.

Gold Silver Rate Today | आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीला बहर; ग्राहकांच्या खिशाला बसणार मोठी झळ
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 8:41 AM

नवी दिल्ली | 2 March 2024 : या आठवड्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. किंमतीत सातत्याने घसरण सुरु होती. पण आठवड्याच्या अखेरच्या सत्रात किंमतीत उसळी आली. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. चांदी तर किलोमागे 600 रुपयांनी महागली. आठवड्याच्या शेवटी दरवाढीचे सत्र गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आता सोने आणि चांदी महागाईचा रस्ता धरतात की ग्राहकांना दिलासा देतात, हे लवकरच समजेल. आता सोने-चांदीची (Gold Silver Price Today 2 March 2024) जाणून घ्या किंमत…

सोने असे वधारले

गेल्या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र होते. प्रत्येक दिवशी किंमतीत बदल दिसत होता. तर या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. आता अखेरच्या सत्रात किंमती वधारल्या आहेत. 26 फेब्रुवारीला सोने 160 रुपयांनी उतरले. 28 फेब्रुवारीला 10 रुपयांची घसरण झाली. 29 फेब्रुवारीला किंमतीत जैसे थे होत्या. 1 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्ताई नंतर चांदी वधारली

दोन आठवड्यात चांदी 3400 रुपयांनी उतरली. 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी उतरली. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांनी स्वस्त झाली. 28 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी किंमत कमी झाली. तर 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 मार्च रोजी पण तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 62,816 रुपये, 23 कॅरेट 62,564 रुपये, 22 कॅरेट सोने 57,540 रुपये झाले.18 कॅरेट 47,112 रुपये, 14 कॅरेट सोने 36,747 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.