Gold Silver Rate Today : आनंदाची बातमी! सोन्यासह चांदी उतरली

Gold Silver Rate Today : अमेरिकन घडामोडींचा जागतिक बाजारावर थेट परिणाम होतो. त्याचा परिणाम इतर देशांमध्ये पण दिसून येतो. या आठवड्यात सोने-चांदीने दरवाढीची मोहिम उघडली होती. पण अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाचा असा फटका दिसून आला.

Gold Silver Rate Today : आनंदाची बातमी! सोन्यासह चांदी उतरली
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 9:36 AM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : अमेरिकन बाजारात पुन्हा दणआपट झाली. अपेक्षेप्रमाणे अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी दरवाढीचा दरवाजा पुन्हा उघडला. महागाईवर नियंत्रणासाठीची ही कसरत आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसून आला. जवळपास सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येईल. व्याजदर वाढले तर डॉलर आणि बँकेच्या ठेवीत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोने-चांदीने दरवाढीची मोहिम राबवली. ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली होती. या आठवड्यात ही कसर भरुन काढण्याचा प्रयत्न दोन्ही धातूंनी केला. आता जागतिक दबावात गुंतवणूकदार काय भूमिका घेतली, यावर सोने-चांदी (Gold-Silver Price Today 26 August 2023), दबाव झुगारुन आघाडी घेईल की घसरण होईल, हे लवकरच समोर येईल.

दरवाढीला लागला ब्रेक

मे आणि जून महिन्यानंतर ऑगस्टमध्ये पण सोने-चांदीचे आक्रमण थोपविण्यात आले होते. दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नव्हती. पण महिन्याच्या अखेरीस या आठवड्यात सोन्याने दबाव झुगारला. किंमतीत मोठी वाढ झाली. ही वाढ सतत सुरु होती. त्यानंतर शेवटच्या दिवशी किंमती किंचित घसरल्या.

हे सुद्धा वाचा

असा झाला बदल

  1. या महिन्यात सोन्यात 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली.
  2. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली.
  3. 23 ऑगस्ट रोजी भावात 180 रुपयांची वाढ झाली.
  4. 24 ऑगस्ट रोजी सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली.
  5. 25 ऑगस्ट रोजी दरवाढीला ब्रेक लागला.
  6. 22 कॅरेट सोने 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम
  7. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव
  8. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.

चांदी किंचित घसरली

या महिन्याच्या सुरुवातीला चांदी घसरली. 16 ऑगस्ट रोजी भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. आता 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या. आता 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली. तर 26 ऑगस्ट रोजी किंमती 500 रुपयांनी कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,400 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,720 रुपये, 23 कॅरेट 58,485 रुपये, 22 कॅरेट सोने 53,788 रुपये, 18 कॅरेट 44040 रुपये, 14 कॅरेट सोने 34,351 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,695रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.