AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : दिवाळीत सोने-चांदी होणार महाग? काय राहिल चाल

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्यात मोठी मुसंडी मारली. किंमतीत चार हजारांची वाढ झाली. चांदीत काहीशी पडझड असली तरी चांदी मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. सोने दिवाळी अगोदरच नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर चांदी पण मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today : दिवाळीत सोने-चांदी होणार महाग? काय राहिल चाल
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 8:37 AM

नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : ऑक्टोबर महिन्यात सोने-चांदीने मोठा पल्ला गाठला. या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. जागतिक घडामोडींमुळे सर्वच गणितं बिघडली. दिवाळीपर्यंत मौल्यवान धातूत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण आता दिवाळीला ग्राहकांना जादा दराने हे धातू खरेदी करावे लागू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका पण मध्य-पूर्वेत थेट उतरल्याने युद्धाची समीकरणं बदलू शकतात. अनेक देशांच्या केंद्रीय बँका सध्या सोन्याचा साठा करत आहेत. सोने-चांदीची (Gold Silver Price Today 29 October 2023) मागणी वाढल्याने भावात मोठी वाढ होऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर महिन्यात या वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. सोने 63,000 रुपयांचा पल्ला गाठू शकते. चांदीविषयी तज्ज्ञांच्या मनात साशंकता आहे.

तेजीचे सत्र कायम

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. पहिल्या दिवशी 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या होत्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढला. 25 ऑक्टोबर रोजी 110 तर 26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 160 रुपयांची तेजी दिसून आली. 28 ऑक्टोबर रोजी किंमती 600 रुपयांची वाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 57,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत पडझड

हा आठवडा चांदीसाठी लक्की ठरला नाही. 23 ऑक्टोबर रोजी सोने 200 रुपयांनी उतरले. 24 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. तर 26 ऑक्टोबर रोजी चांदीने 500 रुपयांची चढाई केली. 27 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,984 रुपयांहून 60,825 रुपयांवर घसरले. 23 कॅरेट 60,740 रुपयांहून 60,581 रुपयांवर आले. 22 कॅरेट सोने 55,861रुपयांहून 55,716 रुपयांपर्यंत खाली आले. 18 कॅरेट 45,619 रुपये, 14 कॅरेट सोने 35,583 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीत 654 रुपयांची घसरण झाली. भाव 70,906 रुपयांपर्यंत घसरले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.