AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 30 June 2024 : सोन्याची दरवाढीची सलामी, तर चांदीत मोठी नरमाई, आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूचा धावफलक काय?

Gold Silver Rate Today 30June 2024 : भारताने T-20 विश्वचषकात रोमहर्षक विजय मिळवला. देशात हर्षोल्लासाचे वातावरण आहे. सोन्याने या आठवड्याच्या अखेरीस दरवाढीचा धावफलक हलता ठेवला. तर चांदीने ग्राहकांना दिलासा दिला.

Gold Silver Rate Today 30 June 2024 : सोन्याची दरवाढीची सलामी, तर चांदीत मोठी नरमाई, आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूचा धावफलक काय?
दरवाढीच्या आघाडीवर सोन्याची फटकेबाजी, चांदी नरमली
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 8:38 AM

भारताने T-20 विश्वचषकात चमत्कार करुन दाखवला. विजय दृष्टीपथात नसताना सामना पलटवला. या सांघिक कामगिरीने भारतीय टीमने विजयश्री खेचून आणला. या आठवड्यात संथावलेल्या मौल्यवान धातूंपैकी सोन्याने पण दमदार कामगिरी दाखवली. आठवड्याच्या अखेरीस सोन्याने जबरदस्त खेळी खेळली. दरवाढीचा फलक हलता ठेवला. तर चांदीला मोठी कामगिरी बजावता आली नाही. चांदीच्या आघाडीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. काय आहेत आता मौल्यवान धातूच्या किंमती, जाणून घ्या…(Gold Silver Price Today 30 June 2024 )

सोन्यात आली उसळी

जून महिन्यात सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. जून महिन्यात ग्राहकांना सोन्याच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला. तरीही सोन्याने धावफलक हलता ठेवला. या आठवड्यात अखेरच्या सत्रात सोन्याने कामगिरी उंचावली. 24 जूनला 150 रुपयांनी तर 26 जूनला 230 रुपये, 27 जून रोजी 270 रूपयांनी भाव उतरला. आठवड्याच्या अखेरीस सोने 450 रुपयांनी महागले. तर 29 जून रोजी त्यात 100 रुपयांची वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत आली नरमाई

या आठवड्यात एकही दिवस चांदीला दरवाढ नोंदविता आली नाही. जून महिन्यात चांदीला दमदार कामगिरी नोंदविता आली नाही. चांदी 97 हजारांच्या घरात होती. आता ती 90 हजारांच्या घरात पोहचली. 24 जूनला 300, 25 जूनला 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 26 जून रोजी किंमत हजारांनी उतरल्या. त्यानंतर आतापर्यंत दरवाढीच्या आघाडीवर शुकशुकाट आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 71,835 रुपये, 23 कॅरेट 71,547 रुपये, 22 कॅरेट सोने 65,801 रुपये झाले. 18 कॅरेट 53,876 रुपये, 14 कॅरेट सोने 42,024 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,000 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.