Gold Silver Rate Today : वर्षाअखेरीस आनंदवार्ता! सोने-चांदीचे भाव अपडेट, असा आहे भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने वर्षाअखेरीस आनंदवार्ता दिली. ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. गेल्या पंधरवाड्यात मौल्यवान धातूंचा भाव सतत वाढला. त्यात घसरण झाली नाही. आता वर्षाअखेरीस दोन्ही धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. किंमतींना ब्रेक लागला आहे. असा आहे आता सोने-चांदीचा भाव...

Gold Silver Rate Today : वर्षाअखेरीस आनंदवार्ता! सोने-चांदीचे भाव अपडेट, असा आहे भाव
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने ग्राहकांसाठी वर्षाअखेरीस आनंदवार्ता आणली आहे. मागील दोन आठवड्यात सोन्याने 2700 रुपयांची भरारी घेतली. तर चांदी 6100 रुपयांनी वधारली होती. सोन्यातील तेजीने ग्राहकांचा हिरमोड झाला होता. सोने आणि चांदीने उच्चांकाकडे धाव घेतली. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. दरम्यान सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. इतके झाले सोने-चांदी स्वस्त (Gold Silver Price Today 31 December 2023)..

सोने झाले स्वस्त

या आठवड्यात दरवाढीनंतर सोने स्वस्त झाले. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी उसळी घेतली. तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. 28 डिसेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. 29 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 30 डिसेंबर रोजी भावात सकाळी बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची स्वस्ताई

या आठवड्यात 25 डिसेंबर आणि  26 डिसेंबर रोजी अनुक्रमे 200 आणि 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. 28 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. 29 डिसेंबर रोजी किंमती 1200 रुपयांनी वधारल्या. 30 डिसेंबर रोजी सकाळी भाव अपडेट झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,246 रुपये, 23 कॅरेट 62,993 रुपये, 22 कॅरेट सोने 57,933 रुपये झाले. 18 कॅरेट 47,435 रुपये, 14 कॅरेट सोने 36,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,395 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.