AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7 September 2024 : सोने-चांदीने दरवाढीचा मुहूर्त साधला; बाप्पाच्या आगमनापूर्वी झरझर भाव वाढला, आता काय आहे किंमत

Gold Silver Rate Today 7 September 2024 : सोने आणि चांदीने दरवाढीचा बरोबर मुहूर्त साधला. बाप्पाच्या आगमनापूर्वी दोन्ही धातूत कमालीची उसळी आली. बेशकिंमती धातूत भाव वाढल्याने वेळेवर खरेदी केलेल्या ग्राहकांची निराशा झाली. बाप्पाला चांदीचे दागदागिने खरेदी करण्यासाठी जादा किंमत मोजावी लागली.

Gold Silver Rate Today 7 September 2024 : सोने-चांदीने दरवाढीचा मुहूर्त साधला; बाप्पाच्या आगमनापूर्वी झरझर भाव वाढला, आता काय आहे किंमत
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 8:32 AM

गेल्या दोन आठवड्यापासून ग्राहकांना सोने आणि चांदीच्या आघाडीवर दिलासा होता. पण गणपती बाप्पाचे आगमन होण्यापूर्वीच दोन्ही धातूंनी दरवाढीचा मुहूर्त साधला. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी दोन्ही धातूत मोठी घसरण झाली. तर सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसात कोणतीही दरवाढ झाली नाही. शनिवारी गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्वीच बेशकिंमती धातूंनी मोठी उसळी घेतली. या धातूत भाव वाढल्याने वेळेवर खरेदी केलेल्या ग्राहकांची निराशा झाली. बाप्पाला चांदीचे दागदागिने खरेदी करण्यासाठी जादा किंमत मोजावी लागली. काय आहे सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 7 September 2024 )

घसरणीनंतर दरवाढीचा मुहूर्त

या आठवड्यातील पाच दिवसात सोन्यात मोठा बदल दिसला नाही. 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सोने स्वस्त झाले. 2 सप्टेंबर रोजी 270 रुपयांनी सोने उतरले. तर 6 सप्टेंबर रोजी सोन्याने 550 रुपयांची उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची जोरदार बॅटिंग

गेल्या दोन आठवड्यापासून चांदीने मोठ्या दरवाढीची वार्ता दिली नव्हती. या आठवड्यात 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. 6 सप्टेंबर रोजी किंमतीत 2 हजारांची उसळी आली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,931, 23 कॅरेट 71,643, 22 कॅरेट सोने 65,889 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,948 रुपये, 14 कॅरेट सोने 42,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,338 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.