Gold Silver Rate Today 9 April 2024 : सोने-चांदीची महागाईची गुढी; दरवाढीला फुटली पालवी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Gold Silver Rate Today 9 April 2024 : आज मराठी नुतन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षांतच सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली आहे. मौल्यवान धातूंनी चैत्राच्या पालवीला दरवाढीचे तोरण लावले. ग्राहकांना या दरवाढीचा मोठा फटका बसला. मंगलकार्याला मौल्यवान धातूंच्या खरेदीचा उत्साह मावळला.

Gold Silver Rate Today 9 April 2024 : सोने-चांदीची महागाईची गुढी; दरवाढीला फुटली पालवी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
सोने आणि चांदीची दरवाढीची गुढी
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 8:45 AM

चैत्राला सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. दोन्ही मौल्यवान धातूची घौडदौड सुरुच आहे. दरवाढीची गुढी उभारल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. सोने आणि चांदीने एप्रिल महिन्यातच सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले आहे. ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. या मौल्यवान धातूंनी इतकी मोठी झेप कशी घेतली हाच ग्राहकांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यामागे काही जागतिक कारणं आहेत. सर्वात मोठे कारण, भारतीय रुपयांचे अवमूल्यन हे आहे. डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीत दिसून येत आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने जवळपास 4,000 रुपयांनी तर चांदी 7,000 रुपयांनी वधारली. हा ग्राहकांसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 9 April 2024)

सोने 4,000 रुपयांनी महागले

  • एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली.
  • 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची उडी घेतली.
  • 2 एप्रिल रोजी 250 रुपयांनी सोने घसरले.
  • 3 एप्रिल रोजी 750 रुपयांची दरवाढ झाली.
  • 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी किंमती वधारल्या.
  • तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांची स्वस्ताई आली.
  • 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची मुसंडी मारली.
  • 7 एप्रिल रोजी भाव जैसे थे होते. तर 8 एप्रिल रोजी 300 रुपयांची भर पडली.
  • गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,800 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने टाकला टॉप गिअर

हे सुद्धा वाचा

एप्रिल महिन्यात चांदीच्या किंमती सूसाट आहे. एका आठवड्यात चांदी 7 हजारांनी वधारली. 1 एप्रिलला 600 रुपयांची दरवाढ झाली. 2 एप्रिल रोजी 400 रुपयांनी किंमती वधारल्या. 3 एप्रिलला चांदीने 2 हजारांची मुसंडी मारली. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. 5 एप्रिल रोजी किलोमागे 300 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 6 एप्रिल रोजी किलोमागे चांदीने 1800 रुपयांची उडी घेतली. तर 8 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपयांपर्यंत खाली आला.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 71,279 रुपये, 23 कॅरेट 70,994 रुपये, 22 कॅरेट सोने 65,292 रुपये झाले.18 कॅरेट 53,459 रुपये, 14 कॅरेट सोने 41,698 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,496 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

ही आहेत कारणं

सोने आणि चांदीने हनुमान उडी घेतली आहे. या दरवाढीने ग्राहकांना मोठे कोडे घातले आहे. किंमती इतक्या झटपट कशामुळे वाढल्या, याचा त्यांना प्रश्न पडला आहे. सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या केंद्रीय बँक, युएस फेडने व्याजदरात कपात केली आहे. जगात दोन ठिकाणी युद्ध सुरु आहेत. भूराजकीय चिंता सर्वच देशांना सतावत आहे. चीनने चांदीची आक्रमकपणे खरेदी सुरु केलेली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. तर भारतीय रुपयांचे अवमूल्यन हा मोठा घटक या दरवाढीला कारणीभूत ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांने नांग्या टाकल्याने चढ्या दराने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.