Gold Silver Rate Today : सोन्याने फुंकली तुतारी! चांदीचा टॉप गिअर, खरेदीदार पावसाळ्यात घामाघूम

Gold Silver Rate Today : अमेरिकेन डॉलर तोंडावर आपटल्या बरोबरच सोन्यात चमकल आली तर चांदीने संबळ वाजवला. दोन्ही धातूंच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. सराफा बाजारात दरवाढीने चैतन्य संचारले. तर खरेदीदारांना घाम फुटला.

Gold Silver Rate Today : सोन्याने फुंकली तुतारी! चांदीचा टॉप गिअर, खरेदीदार पावसाळ्यात घामाघूम
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली : सोन्याला अखेर अच्छे दिन आले. मे आणि जूनमधली मरगळ एका झटक्यात फेकून दिली. सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या होत्या. सोने तर 58000 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. तर चांदीने 70,000 रुपयांची सपोर्ट लेव्हलपेक्षा कमी दर गाठला होता. त्यावेळी सराफा बाजारात खरेदीदारांनी गर्दी केली होती. गुंतवणूकदारांनी भविष्यात किंमती वधारण्याचा अंदाज घेत, गुंतवणूक केली. त्यांच्या चाणाक्षपणाचा आता फायदा होईल. अमेरिकन डॉलर तोंडावर आपटल्याबरोबरच जागतिक बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Price Today) पुन्हा भरारी घेतली. दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या घडामोडींचा बाजारात लागलीच परिणाम दिसला. सराफा बाजारात दरवाढीने चैतन्य संचारले. तर खरेदीदारांना घाम फुटला.

एप्रिलनंतरची मोठी उसळी शुक्रवारच्या सत्रात 14 जुलै रोजी जागतिक बाजारात सोन्याने जोरदार मुसंडी मारली. एप्रिल महिन्यानंतरची ही मोठी दरवाढ असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्पॉट गोल्ड सध्या 1,958.345 प्रति औंस डॉलरवर आहे. तर अमेरिकन फ्युचर गोल्डचा सध्याचा भाव 1,963 प्रति औंस डॉलर आहे.

डॉलर आपटला महागाईच्या आकड्यांचा मोठा परिणाम डॉलरवर दिसून आला. डॉलर दणकावून आपटला. गेल्या वर्षभराच्या निच्चांकावर डॉलर पोहचला. एप्रिल 2022 नंतर डॉलर निच्चांकावर आल्याचे बाजारातील घडामोडींवरुन दिसून येत आहे. आता अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेनंतर डॉलरला किती बळ मिळते हे समोर येईल.

हे सुद्धा वाचा

सोने-चांदीची उसळी जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने सोने उजळले आहे. मे आणि जून महिन्यातील मरगळ सोन्याने झटकून टाकली. सोने 1300 रुपयांनी वधारले. तर चांदीने जोरदार मुसंडी मारली. चांदीने जवळपास 5 हजार रुपयांची उसळी घेतली. यामुळे गुंतवणूकदार मालदार झाले आहेत.

या महिन्यात भरारी 14 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 13 जुलै रोजी सोन्यात 350 रुपयांची वृद्धी झाली. 12 जुलै रोजी, सोने 200 रुपयांनी वधारले होते. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वाढले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची वृद्धी दिसून आली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.13 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

  1. 1213 जुलै, 24 कॅरेट सोने 59,329 रुपये
  2. 23 कॅरेट 59,091 रुपये
  3. 22 कॅरेट सोने 54,345 रुपये
  4. 18 कॅरेट 44,497 रुपये
  5. 14 कॅरेट सोने 34,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
  6. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  7. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते
  8. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.