सोन्या-चांदीचे काय आहेत आजचे भाव ? जाणून घ्या काय झाले स्वस्त आणि महाग

सोने खरेदीदारांसाठी खूषखबर आहे. आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीचे दर वाढले आहेत. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमती 50,861 रुपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 61,074 रुपये आहे.

सोन्या-चांदीचे काय आहेत आजचे भाव ? जाणून घ्या काय झाले स्वस्त आणि महाग
सोन्याचे दर घसरले Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:50 PM

महागाईने पोळलेल्या बाजारात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (American Federal Reserve) व्याज दर वाढीचा परिणाम दिसून येणार आहे. रुपयासोबतच सोन्यावरही (Gold) या व्याजदर वाढीचा परिणाम दिसून येईल. या निर्णयामुळे डॉलर मजबूत स्थितीत येईल. तर सोने कमकुवत होईल. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून येईल. भारतीय सराफा बाजारात(Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे. गुरुवारी भारतीय सराफा बाजारने सोन्या-चांदीचे नवीन दर जाहीर केले आहे. सराफा बाजाराद्वारे नव्याने जाहीर केलेल्या दरानुसार, सोन्याच्या किंमतीत किरकोळ घसरण (Down) झाली. तर चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली.999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमती 50,861 रुपये आहे. इतर शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ही बदल झाला आहे. तर एक किलो चांदीची किंमत 61,074 रुपये आहे.

सोन्या-चांदीचे भाव दिवसातून दोनवेळा बदलतात. एकवेळा सकाळी आणि दुस-या वेळा संध्याकाळी हे दर बदलतात. 995 शुद्धतेचे सोन्याचे दर आज 50,657 रुपय दराने विक्री होत आहे. 916 शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,589 रुपये आहेत. 750 शुद्धतेचे सोन्याचे भाव 38,146 रुपये आहेत. तर 585 शुद्धतेच्या सोन्याचे भाव 29,754 रुपयांने विक्री होत आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव 61,074 रुपये आहेत.

हे सुद्धा वाचा

किती बदलले सोन्या-चांदीचे दर?

एकीकडे सोने स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे चांदीचे भाव वाढले आहेत. 999 आणि 995 शुद्धतेच्या सोन्याचे भाव आज 93 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 916 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 85 रुपयांनी कमी झाले आहेत. तर 750 शुद्धतेच्या सोन्याचे दर 70 रुपयांनी तर 585 शुद्धतेच्या सोन्याचे दर 54 रुपयांनी घसरले आहेत. वही, एक किलो चांदी आज 324 रुपयांनी महाग झाली.

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी

ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते 14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

मिस्ड कॉल द्या, भाव जाणून घ्या

ibja या संकेतस्थळावरील माहितीनुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांव्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी भाव जाहीर करण्यात येत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे किरकोळ भाव जाणून घ्यायचे असतील तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देता येईल. काही वेळातच एसएमएसद्वारे ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर भाव मिळतील.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.