दिवाळीपूर्वीच ग्राहकांची दिवाळी, सोनं 6 हजारांनी स्वस्त

...म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

दिवाळीपूर्वीच ग्राहकांची दिवाळी, सोनं 6 हजारांनी स्वस्त
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 1:59 PM

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Price Today) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव घसरल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX – Multi-Commodity Exchange) वर सोन्याचा वायदा भाव 0.9 टक्क्यांनी घसरत 50,130 रुपये प्रति 10 ग्रामवर आला आहे. तर चांदीचा वायदा भाव 0.88 टक्क्यांनी घसरत 60,605 रुपये प्रति किलो ग्रामवर पोहोचला आहे. (gold silver today rate gold price reduced by 6000 per 10 gram)

खरंतर, शुक्रवारी सोन्याचा भाव 0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाला होता. या दिवशी चांदीच्या भावातही 1.6 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ऑगस्ट महिन्यांमध्ये सोन्याचे भाव प्रति 10 ग्राम 56,200 रुपयांनी गगनाला भिडले होते. यावेळी चांदीचे भावदेखील 80,000 रुपयांवर पोहोचले होते.

जागतिक बाजारपेठ काय आहे अवस्था? जागतिक बाजारपेठेविषयी बोलायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1900 डॉलर प्रति अंशवर स्थिर राहिला. मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीवर डॉलरचा भयंकर परिणाम झाला होता. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉलरची किंमत घसरल्यामुळे गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus Pandemic) जीवघेण्या महामारीमुळे जगभरात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता स्थिती सुधारत आहे. त्यामुळे सराफा बाजारात 30 सप्टेंबरपर्यंत 5,684 रुपये प्रति 10 ग्राम घसरण पाहायला मिळाली.

दिवाळीपर्यंत वाढती सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाला होता. अशात आता भारतात धनत्रोयदशी आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.

इतर बातम्या –

आर्थिक अडचण असेल तर काळजी सोडा, सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?

(gold silver today rate gold price reduced by 6000 per 10 gram)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.