7 कोटी पीएफ खातेदारांसाठी खुशखबर; EPFO खात्यात जमा झाली व्याजाची रक्कम, असे करा चेक

EPFO Passbook : केंद्र सरकारने ईपीएफओ खातेदारांना आनंदवार्ता दिली आहे. त्यांच्या EPFO खात्यात जमा झाली व्याजाची रक्कम जमा झाली आहे. कोट्यवधी खातेदारांना दिलासा दिला आहे. खात्यात रक्कम जमा झाली की नाही ते असे तपासा.

7 कोटी पीएफ खातेदारांसाठी खुशखबर; EPFO खात्यात जमा झाली व्याजाची रक्कम, असे करा चेक
व्याजाची रक्कम झाली जमा, असे तपासा
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 11:27 AM

केंद्र सरकारने ईपीएफओ (Employees’ Provident Fund Organization) खातेदारांच्या खात्यात 8.25% वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करण्याचे काम सुरु केले आहे. देशभरातील कोट्यवधी खातेधारकांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात लागलीच सर्वच खातेदारांच्या खात्यात रक्कम झालेली नाही. व्याजाची रक्कम सर्वांच्याच खात्यात आलेली नाही. पण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तुम्हाला तपासात येते.

7 कोटींहून अधिक खातेदारांना दिलासा

देशभरातील 7 कोटींहून अधिक खातेदारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. ईपीएफओ 8.25% वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंडळाने शिफारस केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने मे महिन्यात 8.25% व्याज दर निश्चित केला होता. या दराने व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

इतक्या सदस्यांच्या खात्यात रक्कम

आतापर्यंत ईपीएफओने 23,04,516 सदस्यांच्या खात्यात वार्षिक 8.25% व्याजदराने एकूण 9,260.40 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ईपीएफओने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8.25% व्याजदराची घोषणा केली होती. व्याजाची रक्कम लवकरच सदस्यांच्या खात्यात जमा होईल.

या चार पद्धतीने तपासा बॅलन्स

अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

एसएमएसद्वारे जाणून घ्या शिल्लक

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

EPFO पोर्टलवर तपासा बॅलेन्स

EPFO संकेतस्थळावर employees सेक्शन निवडा. त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. तुमचा UAN आणि पासवर्ड नोंदवा. त्यानंतर तुम्हाला पीएफ पासबुक एक्सेस करता येईल. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्ससह कर्मचारी आणि कंपनीचे योगदान यामध्ये दिसून येते. पीएफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पीएफवरील व्याजाची रक्कम दिसेल.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.