Paytm पेमेंट्स बँकेच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, रिचार्ज आणि बिलवर पेमेंटवर 20% सूट
या दिवसांमध्ये ग्राहकांना मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, पेटीएम अॅपद्वारे बिल पेमेंटवर सुमारे 20 टक्के त्वरित सूट मिळू शकते. ही विशेष ऑफर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा डेबिट कार्ड धारकांसाठी आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना व्हिसा आणि रुपे डेबिट कार्ड जारी करते.
नवी दिल्ली : पेटीएम एक डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. पेटीएम कंपनी आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सर्वोत्तम रिचार्ज ऑफर देत राहते. या दिवसांमध्ये ग्राहकांना मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, पेटीएम अॅपद्वारे बिल पेमेंटवर सुमारे 20 टक्के त्वरित सूट मिळू शकते. ही विशेष ऑफर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा डेबिट कार्ड धारकांसाठी आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना व्हिसा आणि रुपे डेबिट कार्ड जारी करते.
ऑफर नेमकी काय?
जर तुम्ही पेटीएम अॅपद्वारे 48 किंवा त्याहून अधिक रुपयांचे मोबाईल रिचार्ज केले तर तुम्हाला 10 रुपयांची झटपट सूट मिळेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. मात्र, यासाठी ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. मोबाईल रिचार्ज व्यतिरिक्त डीटीएच रिचार्ज, वीजबिल आणि गॅस बुकिंगवरही अशाच ऑफर चालू आहेत.
मोबाईल रिचार्ज ऑफर – किमान 48 रुपयांच्या मोबाईल रिचार्जवर 10 रुपये त्वरित सूट डीटीएच रिचार्ज ऑफर- किमान 100 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 % त्वरित सूट (कमाल सवलत- रु. 50) वीजबिल ऑफर- किमान 500 रुपयांच्या वीजबिलावर 10% झटपट सूट (कमाल सवलत- 100 रुपये) गॅस बुकिंग ऑफर – किमान 500 रुपयांच्या गॅस बुकिंगवर 50 रुपये त्वरित सूट
पेटीएम अॅपसह मोबाईल रिचार्ज कसे करावे?
1. तुमचे पेटीएम अॅप उघडा. 2. यानंतर All Service वर क्लिक करा. 3. आता तुम्हाला रिचार्ज आणि पे बिलवर जावे लागेल आणि मोबाईल प्रीपेडवर क्लिक करावे लागेल. अॅपच्या मुख्य पेजवर रिचार्ज आणि पे बिलचा पर्याय आहे. 4. आता मोबाईल नंबर टाका. यानंतर सेवा प्रदाता आणि मंडळ निवडावे लागेल. 5. यानंतर रिचार्जची रक्कम टाकावी लागेल. 6. यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल.
संबंधित बातम्या
पोस्टात 5 वर्षांत 132000 रुपये परतावा मिळवा, गुंतवणूक अन् व्याजाचे गणित समजून घ्या
EPF: हा फॉर्म भरल्याशिवाय पीएफ पैशांवर दावा करू शकणार नाही, जाणून घ्या सर्वकाही
Good news for Paytm Payments Bank users, 20% discount on recharge and bill payment