पेन्शनर्ससाठी चांगली बातमी, आता NPS मधून एकाच वेळी काढा संपूर्ण रक्कम, पण एक अट

पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन फंडासह सर्व ग्राहक आपली संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतात, असंही पीएफआरडीएने सांगितले.

पेन्शनर्ससाठी चांगली बातमी, आता NPS मधून एकाच वेळी काढा संपूर्ण रक्कम, पण एक अट
पेंशन योजनेमधील गुंतवणुकीत लोकांचा कल वाढला; एनपीएसमध्ये 24 टक्के वाढ
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 9:32 AM

नवी दिल्लीः निवृत्तीवेतनाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. तसेच त्यामध्ये त्यांनी त्यांच्या निधीतून संपूर्ण रक्कम मागे घेण्याची मागणी केलीय. पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन फंडासह सर्व ग्राहक आपली संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतात, असंही पीएफआरडीएने सांगितले. ही संपूर्ण रक्कम काढण्यासाठी त्यांना एन्युइटी खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

तर ग्राहकांना ही संपूर्ण रक्कम मागे घेण्याचा पर्याय

पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएच्या मते, ज्यांच्या स्थायी सेवानिवृत्ती खात्यात 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असेल किंवा प्राधिकरणाने ठरवलेल्या रकमेची मर्यादा असेल, तर ग्राहकांना ही संपूर्ण रक्कम मागे घेण्याचा पर्याय मिळेल. यासाठी त्यांना एन्युइटी खरेदी करण्याची गरज नाही. येथे एन्युइटी खरेदी करणे म्हणजे विमा कंपन्यांकडून निवृत्तीवेतन योजना खरेदी करण्यासारखे आहे.

आतापर्यंत एनपीएस माघारीबाबत नियम काय?

आतापर्यंतच्या नियमांनुसार एनपीएस ग्राहकाला सेवानिवृत्तीपर्यंत किंवा 60 वर्षे वयापर्यंत 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास विमा कंपन्यांकडून एन्युइटी खरेदी करणे अनिवार्य आहे. सब्‍सक्राइबर्स एकरकमी 60 टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी आहे. परंतु उर्वरित 40 टक्के रकमेवरून त्यांना एन्युइटी खरेदी करणे बंधनकारक आहे.

एनपीएस ग्राहक हे केवळ तीनदा काढू शकतात पैसे

एनपीएस ग्राहक 3 वर्षांनंतरच त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढू शकतात. पण त्यासाठीही काही अटी पाळाव्या लागतात. मॅच्युरिटी होण्यापूर्वी जर रक्कम काढली जात असेल तर ही रक्कम एकूण योगदानाच्या 25 टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही. यातून अर्धी रक्कम फक्त मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, घर खरेदी किंवा कोणत्याही गंभीर आजारासाठी काढली जाऊ शकते. संपूर्ण कार्यकाळात एनपीएस ग्राहक हे केवळ तीन वेळा असे करू शकतात. आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की, अशा सर्व पैसे काढणे प्राप्तिकर नियमांनुसार पूर्णपणे करमुक्त असतात.

सर्व पैसे काढल्यानंतर काय होते?

पीएफआरडीएने असे म्हटले आहे की, अशा ग्राहकांचा पेन्शन मिळविण्याचा अधिकार गमावला जाईल. या व्यतिरिक्त पेन्शन नियामकाने ग्राहकांना आणखी एक दिलासा दिलाय. राजपत्र अधिसूचनेत पीएफआरडीएने म्हटले आहे की, मॅच्युरिटी येण्यापूर्वी एनपीएसवरून एकरकमी पैसे काढण्याची मर्यादा वाढविली गेली आहे. पूर्वी ही पैसे काढण्याची मर्यादा ग्राहकांसाठी 1 लाख रुपये होती, परंतु ती वाढवून अडीच लाख करण्यात आली आहे.

NPS मध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा 65 वर्षांवरून वाढवून 70 वर्षे

पीएफआरडीएने नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा 65 वर्षांवरून वाढवून 70 वर्षे केली. याचा अर्थ असा की आता 70 वर्षांचे देखील एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात. बाहेर जाण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 75 वर्षांपर्यंत कमी केली गेली.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! तुमच्या बँकेत जमा पैशांवर 5 लाखांचा विमा मिळणार, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 12 महिन्यांत केले श्रीमंत, 1 लाखाचे झाले 5 लाख

Good news for pensioners, now withdraw the entire amount from NPS at once, but one condition

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.