एअर इंडिया आणि एअर एशिया देणार एकमेकांच्या प्रवाशांनाही विमानात ‘एंट्री’
एका कराराव्दारे या महिन्यापासून ते पुढील दोन वर्षांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. यातून प्रवाशांची सोय होणार असून, विमानसेवेत अधिक सूसूत्रता येणार असल्याचे बोलले जात आहे. टाटा ग्रुपकडे एअर इंडियाची सूत्रे परत आल्यानंतरचा हा पहिला मोठा निर्णय म्हणावा लागेल.
संतोष सूर्यवंशीः एअर इंडिया (Air India) आणि एअर एशिया (Air Asia) यांनी नुकत्याच केलेल्या एका करारानुसार काही कारणास्तव विमान वाहतुकीस व्यत्यय आल्यास त्यांना एकमेकांच्या प्रवाशांना घेऊन जाण्याची परवानगी मिळणार आहे. या दोन्ही विमान कंपन्या आता टाटा समूहाचा (Tata Group) भाग आहेत. या महिन्यापासून सुरू होणारी ही विशेष व्यवस्था पुढील दोन वर्षांसाठी कार्यान्वीत करण्यात येणार आहे. एअर इंडिया आणि एअर एशियाच्या या करारामुळे प्रवाशांची गैरसोय टाळता येणार आहे. या व्यवस्थेचे प्रवाशांकडूनही स्वागत करण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी एका कराराद्वारे IROPS व्यवस्थेमध्ये नोंदणी केली आहे. ज्यामुळे प्रवाशांना एकमेकांच्या ‘फ्लाइट’मध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे. दरम्यान, प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देत असताना दोघे कंपन्यामधील कुठल्याही एका एअरलाइनच्या विमानतळ व्यवस्थापकाकडे विमानसेवेच्या उपलब्धतेच्या आधारावर प्रवासी वाहतूक करण्यात येणार असल्याची अट त्यात नमूद करण्यात आली आहे.
हस्तांतरानंतर पहिला मोठा निर्णय
दरम्यान, टाटा ग्रुपकडून गेल्या सात दशकांपासून हातातून निसटल्यानंतर गेल्या महिन्यात टाटा ग्रुपकडे एअर इंडिया परत आली आहे. एअर इंडिया कंपनी आता टाटा यांच्या नेतृत्वाखालील पुढील कार्य व वाटचाल करत असताना त्यानंतरचा हा पहिलाच मोठा निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे. 1946 मध्ये टाटा एयरलाइन्सचे टाटा सन्समधील एक ‘डिविजन’द्वारे विस्तारीकरण करण्यात आले होते.
प्रवाशांना वळवण्याचा प्रयत्न
गेल्या महिन्यात मालकी हक्काची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाने टाटा समूहाला ट्विटर हँडलवरुन पहिला संदेश पाठविला. ‘नव्या मालकासोबत नवीन विमान उड्डाण करण्याच्या तयारीत आहे’, असे ट्वीट एअरलाइन्सने आपल्या अधिकृत हँडलवरून केले होते. दोन मोठे ब्रँड एकत्र आले आहेत, त्यामुळे प्रवाशांसाठी कुठल्या अधिक नवीन सुविधा देता येतील, विमानसेवा अधिक कशी आरामदाय करता येईल, प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे कसे वळवता येईल, याकडे दोन्ही कंपन्या लक्ष देत आहेत. प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देत असताना दोन्ही कंपन्यामधील कुठल्याही एका एअरलाइनच्या विमानतळ व्यवस्थापकाकडे विमानसेवेच्या उपलब्धतेच्या आधारावर प्रवासी वाहतूक करण्यात येणार असल्याची अट घालण्यात आली आहे.
इतर बातम्याः