15 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कमी उत्पन्न गटाच्या नागरिकांसाठी सरकारने मोठी योजना लागू केली आहे (Government will pay PF).
नवी दिल्ली : भारतीय उद्योगधंदे, बाजारपेठा, कंपन्या, नागरिक या सर्वांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे (Government will pay PF) . मात्र, कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार विविध महत्त्वपू्र्ण योजना लागू करुन नागरिकांना दिलासा देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कमी उत्पन्न गटाच्या नागरिकांसाठी सरकारने मोठी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 15 हजारांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरकांना मोठा दिलासा मिळणार आहे (Government will pay PF).
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबत मोठी घोषणा केली. केंद्र सरकार पुढचे 3 महिने 15 हजारांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा कंपन्यांनाही होणार आहे. कारण कंपन्यांचाही पीएफ सरकारच भरणार आहे.
नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या आर्धा पीएफ त्यांच्या पगारातून कापला जतो तर अर्धा पीएफ कंपनी भरते. मात्र, पुढचे तीन महिने केंद्र सरकार 15 हजारांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे देणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि कंपन्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा 80 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि 4 लाखांपेक्षा जास्त कंपन्यांना फायदा होणार आहे.
योजनेसाठी सरकारच्या काही अटी
या योजनेसाठी केंद्र सरकारच्या काही अटी आहेत. सरकारी अटींनुसार ज्या कंपन्यामध्ये 90 टक्के कर्मचाऱ्यांचे महिन्याचा पगार 15,000 रुपये आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. याशिवाय 15000 रुपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही.
किती फायदा होणार?
साधारणत: 15 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा (बेसिक + डीए) हा 7000 हजार रुपये असतो. या रकमेतून 12 टक्केन रक्कम म्हणजेच 840 रुपये पीएफ कापला जातो. तितकाच पीएफ कंपनीकडून दिला जातो. मात्र, सरकारने आता पुढच्या तीन महिन्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीचा वाट्याचा पीएफ भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार प्रत्येक महिन्याला दोघी बाजूचे 840 रुपये म्हणजेच एकूण 1680 रुपये रक्कम देणार आहे.
गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत
लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलं. पुढील तीन महिने गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार आहेत.
संबंधित बातम्या :