रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत मोठा दिलासा; महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ

रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागाकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे. महागाई भत्त्यात तब्बल 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढल्याने आता या कर्मचाऱ्यांचा पगार हजारो रुपयांनी वाढणार आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत मोठा दिलासा; महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:14 AM

नवी दिल्ली : सध्या महागाई (Inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. महागाईने गेल्या 9 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. नोकरदार (Servant) वर्गासह सर्वच नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. मात्र आता महागाईचा सामना करत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) एकाच वेळी तब्बल 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सोबतच त्यांना दहा महिन्यांचा एरियर देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आता त्यांचा पगार हजारो रुपयांनी वाढणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा हा डीए सहाव्या वेतन आयोगानुसार वाढवण्यात आला आहे. सोबतच त्यांना दहा महिन्यांचा एरियर देखील देण्यात येणार आहे.

सहाव्या वेतन आयोगानुसार वाढ

सहाव्या वेतन आयोगानुसार रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनदा सात-सात टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवण्यात आला. मात्र याचा लाभ एकाच वेळी लागू करण्यात आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाचवेळी 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोबतच मागच्या थकीत महागाई भत्त्याचा एरियर देखील त्यांना मिळणार आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

केंद्र सरकारकडून परवानगी

रेल्वे विभागाकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार 2021 मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तेव्हा महागाई भत्ता हा 189 टक्क्यांहून वाढून 196 वर पोहोचला होता. तर दुसऱ्यांदा जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता पुन्हा सात टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने आता महागाई भत्ता 196 वरून 203 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र या दोनही वाढीव भत्त्याचा लाभ एकाचवेळी देण्यात येणार असल्याने त्यांच्या महागाईभत्त्यात चौदा टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ

दरम्यान यापूर्वी मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. सध्या वाढत असलेली महागाई पहाता येत्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी वाढू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.