AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Green Bond : आता कमाई तर कराल, पण समाधानही मिळवाल, सरकारची ही Green Bond योजना आहे तरी काय..

Green Bond : कमाईसोबतच तुम्हाला गुंतवणुकीतून समाधानही मिळविता येणार आहे..

Green Bond : आता कमाई तर कराल, पण समाधानही मिळवाल, सरकारची ही Green Bond योजना आहे तरी काय..
कमाईसोबत समाधानImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 6:30 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच ग्रीन बॉंड (Green Bond) मंजूरी देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Finance Minister) सॉवरेन ग्रीन बाँड बाजारात आणण्याची तयारी केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने (Central Government) ग्रीन बाँड आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लवकरच तुम्हाला कमाईसोबतच गुंतवणुकीतून समाधानही मिळवून देणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 16,000 कोटी रुपयांचे बाँड आणणार आहे. या योजनेतून कमाई तर होईलच पण कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या योजनांवर खर्च करण्यात येणार आहे.  त्यामाध्यमातून पर्यावरणाचा, निसर्गाचा समतोल साधण्यात येईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी ग्रीन बाँडच्या माध्यमातून निधी उभारण्याचा संकल्प सोडला होता. PTI च्या वृत्तानुसार, याविषयीचे नियोजन करण्यात आले आहे. सरकार लवकरच या योजनेला मंजूरी देणार आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांचा पैसा, त्या सरकारी योजनांमध्ये ओतण्यात येणार आहे, ज्या योजना कमी कार्बन उत्सर्जन करतील. त्याआधारे पर्यावरण वाचविण्याची कसरत तर करण्यात येईलच, पण गुंतवणूकदारांचा फायदा ही करुन देण्यात येणार आहे.

पर्यावरणासाठी सरकारच्या सकारात्मक निर्णयाला ग्रीन बाँडच्या माध्यमातून मोठा गुंतवणूकदार अप्रत्यक्षरित्या मोठे आर्थिक बळ देतात. ग्रीन बाँडची सुरुवात युरोपमध्ये 2007 मध्ये करण्यात आली होती. त्यामाध्यमातून अपारंपारिक ऊर्जा आणि इतर पर्यावरण पूरक प्रकल्पांसाठी मोठा निधी उभा करता आला.

ग्रीन बाँडच्या माध्यमातून बायोगॅस, इलेक्ट्रिक, सौर ऊर्जा तसेच सर्व अपारंपारिक योजनांसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनांना आर्थिक पाठबळ मिळेल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.