GST Collection : नागरीक महागाईने बेजार, सरकार GST मुळे मालामाल..

GST Collection : जीएसटी संकलनातून सरकारने लाख कोटींची कमाई केली आहे..

GST Collection : नागरीक महागाईने बेजार, सरकार GST मुळे मालामाल..
तिजोरीत आली लक्ष्मीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 5:44 PM

नवी दिल्ली : जीएसटी संकलनातून (GST Collection) केंद्र सरकार (Central Government) पुन्हा एकदा मालामाल झाले आहे. एकीकडे महागाई (Inflation) रेकॉर्ड तोडत असताना दुसरीकडे वस्तू आणि सेवा (GST) करातून तिजोरीत गंगाजळी येत आहे. ऑक्टोबर महिन्यातही रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात जीएसटी वसुलीत विक्रम झाला आहे. 1.5 लाख कोटींचा जीएसटी या कालावधीत वसूल झाला आहे. अर्थमंत्रालयाने मंगळवारी याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे.

ऑक्टोबर हा दुसरा असा महिना ठरला, जेव्हा जीएसटी वसुली सर्वात चांगली झाली आहे. ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा होता. दिवाळी ही याच महिन्यात होती. त्यामुळे या काळात जनतेने जोरदार खरेदी केली. त्याचा फायदा सरकारी तिजोरीला झाला.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्रालयानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 1,51,718 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली. यापूर्वी एप्रिल, 2022 मध्ये सर्वाधिक जीएसटी वसुली झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारला 1.50 लाख कोटींची कर प्राप्ती झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय जीएसटीतून 26,039 कोटी, राज्यांच्या मदतीने 26,039 कोटी तर केंद्र आणि राज्यांनी संयुक्तरित्या 81,778 कोटी रुपये जमा केले आहे.

या कर वसुलीत आयात शुल्काचा ही मोठा वाटा आहे. आयात शुल्काच्या मदतीने सरकारी तिजोरीत 37,297 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर सेसच्या माध्यमातून 10,505 कोटी रुपये जमा झाले आहेत.

जीएसटी लागू झाल्यापासून ऑक्टोबर असा महिना ठरला ज्यावेळी जीएसटी वसुली 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. याच वर्षात सर्वाधिक जीएसटी वसूल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर मधील जीएसटीचे आकडे सप्टेंबर महिन्यात जनरेट झालेल्या ई-वे बिलाआधारे प्राप्त होतात. सप्टेंबर महिन्यात 8.3 कोटींचे ई-वे बिल जनरेट झाले होते. हे आकडे ऑगस्ट महिन्यातील 7.7 कोटी ई-वे बिलपेक्षा जास्त आहेत.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.