सॅनिटायझर ते कोविड औषधांवर 5% जीएसटी निश्चित, केंद्राची संसदेत माहिती
सध्या देशातील 66 टक्के आरोग्य विमा योजना केंद्राद्वारे चालविल्या जातात. कोविड प्रकोपाच्या (COVID CRISIS) सुरुवातीपासूनच औषधांची विक्री 5 ते 12 टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली.
नवी दिल्ली- केंद्रीय वस्तू आणि सेवा (GST) कराच्या कक्षेतील कोविड औषधे आणि उपकरणांवरील जीएसटीत फेरबदल करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलनं कोविड औषधे व उपकरणांवर पाच टक्के जीएसटी निश्चित केला आहे. अन्य औषधांच्या विक्रीवर 5-12 टक्के जीएसटीची आकारणी केली जाते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान माहिती सांगितली. सध्या देशातील 66 टक्के आरोग्य विमा योजना केंद्राद्वारे चालविल्या जातात. कोविड प्रकोपाच्या (COVID CRISIS) सुरुवातीपासूनच औषधांची विक्री 5 ते 12 टक्के जीएसटीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली. कोविड संबंधित औषधे व उपकरणांवरील जीएसटी दरात (GST RATE DEDUCTION) कपात करुन पाच टक्के करण्यात आला आहे.
विम्यावर कराचा भार:
आरोग्य विम्यावर जीएसटी 18 टक्के आहे. कोविडपूर्व काळापासून हे दर होते. ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजनांवर एक लाख रुपयांपर्यंत टॅक्स रिबेटचा फायदा घेऊ शकतात अशी माहिती आरोग्य राज्य मंत्र्यांनी दिली आहे.
कोविड प्रकोपामुळं सर्वाधिक फटका बसला. औषधांच्या तुटवड्यासोबत ऑक्सिजनची कमतरतेचा प्रश्न गंभीर बनला होता. कोविड काळात मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन उपकरणे, रेमिडेसीवर यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासली होती. अन्य औषधांप्रमाणे कोविड औषधे व उपकरणांवर जीएसटी परिषदेने दर निश्चिती केली होती.
ब्लॅक फंगस औषध ‘जीएसटी फ्री’:
कोविड दुसऱ्या लाटेदरम्यान जीएसटी परिषदेने ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तसेच रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट दिली होती. मात्र, लशींवरील 5 टक्के जीएसटीचा दर कायम ठेवला होता. रेमडेसिवीरील जीएसटी दरात 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्यात आला. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली होती.
‘या’ उपकरणावर जीएसटी:
बायपॅप मशीन, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, कोविड टेस्टिंग किट, हँड सॅनिटाझर, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्स आदींवर जीएसटीची आकारणी केली जाते.